अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले साधणार ट्रम्प यांच्याशी संवाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 PM2021-01-08T17:36:58+5:302021-01-08T17:42:52+5:30

अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले डोनाल्ट ट्रम्प यांच्याशी संवाद साधणार असून अमेरिकन संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेला गोंधळ योग्य नसल्याची टिका करतानाच हा लोकशाहीचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अपमान असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

Dialogue with Trump on Ramdas Athavale on US power struggle | अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले साधणार ट्रम्प यांच्याशी संवाद 

अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले साधणार ट्रम्प यांच्याशी संवाद 

googlenewsNext
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस पुन्हा येणार... राज्यातील सरकार लवकच कोसळेलरामदास आठवले यांचे भाकीत

नाशिकऔरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेतील संघर्षामुळे लवकरच राज्यातील सरकार कोसळणार असून देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे भाकीत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्याचप्रमाणे सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या सत्तासंघर्षावरही त्यांनी भाष्य केले असून आपण याविषयावर डोनाल्ड ट्रम यांच्याशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी विविध विषयांना स्पर्ष करतानाच अमेरिकेतील सत्तासंघर्षावरही भाष्य करताना अमेरिकन संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेला गोंधळ योग्य नसल्याची टिका करतानाच हा लोकशाहीचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अपमान असल्याचे मत व्यक्त केले. ट्रम्प यांनीही पराभव मान्य करावा असे आवाहन करतानाच याविषयावर आप ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध नाही, मात्र सध्या नामकरणाची आवश्यकता नाही, केवळ निवडणुका असल्याने नामांतराच्या मुद्द्यावर राजकारण होत असल्याची टिका केंद्रीय मंत्री तथा आरपी आय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. यापूर्वी शिवसेना सत्तेत असताना नामकरण का केले नाही असा सवाल करतानाच आता शिवसेनेने नामकरणाचा आग्रह केला तर काँग्रेस त्यांना सोडून जाईल असे भाकीत ही त्यांनी यावेळी केलेते म्हणाले, छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाला आमचा विरोध नाही, मात्र तेथील विमानतळ‌ाला अजंठा वेरूळ असे नाव द्यावे, नामंतराच्या मु्द्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेतील ताणलेल्या संबंधाकडे लक्ष वेधत राज्यातील सरकार आपसातील मतभेदांमुळे कोसळून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, देशभरातील कोरोना स्थितीवर बोलताना कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावल्याचे मान्य करतानाच लसीकरणाचा खर्च राज्यांनी करावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Dialogue with Trump on Ramdas Athavale on US power struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.