भर दिवसा बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:18 PM2018-06-12T13:18:25+5:302018-06-12T13:18:25+5:30
पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पिळकोस येथील शेतकरी कौतिक दौलत मोरे यांच्या पळासे शिवारात त्यांनी त्याच्या घरच्या दुभत्या जनावरांसाठी चार एकर हिरवा चारा केलेला असून त्यांचा मुलगा आदित्य मोरे ,व सालगडी हे काल चार वाजता चारा घेण्यास गेले असता बिबट्या हा शेताच्या बांधावर बसलेला होता. त्यावेळेस आदित्य त्याचा मित्र दुर्गेश सूर्यवंशी व सालगडी यांनी त्याच पाउली मागे फिरत रस्त्याकडे धाव घेतली . गेल्या सहा महिन्यापासून या परिसरात बिबट्याने दहशत माजवलेली असून भादवण पिळकोस शिवार तर कधी गिरणा नदी शिवार तर काही वेळेस गिरणा नदीवरील पिळकोस ङ्क्तबगडू पुलावर आता बिबट्या दिवसा दिसू लागल्याने शेतकरी ,पशुपालक ,व शेतमजूर हे धास्तावले असून परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे . पाच ते सहा वर्षापासून ह्या शिवारात बिबट्याचा संचार असल्याने बिबट्याच्या हल्ल्यात आजवर कित्येक शेतकर्यांचे व पशुपाल्कानाचे जनावरांचा फडशा बिबट्याने पडलेला आहे . भादवण शिवारात बिबट्याचा वावर हा सततचा असल्याने शेतकर्यांना व पशुपालकांना बिबट्याचे सतत भय लागून राहत असल्याने शिवारात दिवसाही भीती वाटू लागल्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे व हा परिसर कायमचा बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करावा अशी मागणी शांताराम जाधव ,दुर्गेश सूर्यवंशी ,सचिन वाघ ,केवळ वाघ ,प्रवीण जाधव ,संदीप जाधव ,निवृत्ती जाधव ,दादाजी जाधव ,बुधा जाधव ,रवींद्र वाघ ,राहुल सूर्यवंशी ,साहेबराव आहेर ,प्रभाकर जाधव ,हेमंत जाधव ,सुरेश जाधव ,राहुल जाधव ,मंगेश जाधव ,अभिजित वाघ ,यांसह पशुपालक ,शेतमजूर ,व शेतकºयांनी केली आहे .
-----------------
पळासे शिवारात बिबट्या हा नेहमी वावरत असून आजवर आम्हाला त्याच्या पावलांचे ठसे मिळून आले होते व आता तर बिबट्या दिवसाही दिसून येत असल्याने साहजिक भीती वाटू लागली आहे. सालगडी ,शेतमजूर ,कामाला येण्यास धजावत नसून शेतीच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. वनविभागाने पिंजरा लाऊन बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे .
- कौतिक दौलत मोरे ,शेतकरी ,पिळकोस