मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातात वाढले मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:51+5:302021-06-27T04:10:51+5:30
गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आली. मार्चपासून कोरोनाची रुग्णसंख्या मागीलवर्षी वाढू लागली होती. राज्य सरकारसह केंद्र सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ...
गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आली. मार्चपासून कोरोनाची रुग्णसंख्या मागीलवर्षी वाढू लागली होती. राज्य सरकारसह केंद्र सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक लॉकडाऊन घोषित केला. यामुळे २०१९सालच्या तुलनेत गेल्यावर्षी अपघात जरी वाढले असले तरी मृत्यूचे प्रमाण घटल्याचे शहर वाहतूक शाखेकडे असलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्यावर्षी एप्रिलपासून तर जूनपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. जुलैपासून काहीप्रमाणात शिथिलता दिली गेली; मात्र ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानंतर पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले होते. यावर्षीही मार्चपासून मे महिन्यापर्यंत लॉकडाऊन सुरूच होते. काही प्रमाणात निर्बंध मेच्या दुसऱ्या आठवड्यात शिथिल झाले होते. लॉकडाऊन काळात रस्त्यांवरील वाहतूक कमी झाल्याचे चित्र जरी पहावयास मिळाले तरीदेखील अपघातांच्या घटना घडतच होत्या. २०१९सालच्या तुलनेत गेल्यावर्षी एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत नाशकात अपघातात ४५ने वाढ झाली; मात्र मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा २४ने कमी झाला. तसेच जखमींचा आकडाही ९५ने घसरल्याचे दिसते.
-आलेख-
वर्षे - अपघात - जखमी - मृत्यू
२०१९- १०७ २८३ - १०९
२०२०- १५२ १८८ -- ०८५
२०२१- (मेपर्यंत) २०३ १९३ -०७१
पहिला लॉकडाऊन- ३६ - ०८३ -- ०४०
दुसरा लॉकडाऊन - ११० --- १०१ -- ०४४
---इन्फो---
पायी चालणाऱ्यांनाही धोका
लॉकडाऊन शिथिलतेनंतर पादचाऱ्यांनाही धोका वाढला. दुचाकी, चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांनाही आपले प्राण गमवावे लागले. मागीलवर्षीसुद्धा रस्ते अपघातात पायी जाणाऱ्या नागरिकांचे मृत्यूचे प्रमाण अधिक होते.
---इन्फो---
भरधाव वाहतूक धोक्याची
मागील वर्षी भरधाव वाहतूक हे अपघाताचे मुख्य कारण राहिल्याचे दिसून आले. अमर्याद वेगाने वाहन चालविल्यामुळे २६७ अपघात घडले. यावर्षीसुध्दा वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवलेले नाही. जानेवारीपासून आतापर्यंत भरधाव वेगाने वाहने चालवून झालेल्या अपघातांची संख्या अधिक आहे.
---इन्फो---
पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन हे फारसे कडक केलेले नव्हते. मागीलवर्षी लॉकडाऊनकाळात जुलैपर्यंत ३६ अपघात झाले होते. यावर्षी ११० अपघात घडले. मागीलवर्षी ४०, तर यावर्षी ४४ लोकांचा लॉकडाऊनकाळात मृत्यू झाला.
---
===Photopath===
260621\26nsk_15_26062021_13.jpg
===Caption===
मरण स्वस्त झाले.