डिझेलअभावी बसेसला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:44 AM2019-12-17T01:44:34+5:302019-12-17T01:45:04+5:30

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील बसेसला लागणारे इंधन उपलब्ध नसल्याने बाहेरगावी जाणाºया आणि बाहेरगावाहून आलेल्या बसेसला ब्रेक लागला आहे. डिझेल नसल्याने सर्व बसेस डेपोतच उभ्या असून, चालक-वाहकांना सक्तीची रजा घेण्याच्या सूचना देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्येदेखील तीव्र नाराजी आहे.

 Diesel buses 'break' | डिझेलअभावी बसेसला ‘ब्रेक’

डिझेलअभावी बसेसला ‘ब्रेक’

Next

नाशिक : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील बसेसला लागणारे इंधन उपलब्ध नसल्याने बाहेरगावी जाणाºया आणि बाहेरगावाहून आलेल्या बसेसला ब्रेक लागला आहे. डिझेल नसल्याने सर्व बसेस डेपोतच उभ्या असून, चालक-वाहकांना सक्तीची रजा घेण्याच्या सूचना देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्येदेखील तीव्र नाराजी आहे. दरम्यान, या प्रकरणी विभागीय कार्यालयात अधिकाºयांची तातडीने बैठक होऊन डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत सुमारे तासभर चर्चा सुरू होती.
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील १३ डेपोंमधून जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर धावणाºया बसेसला सुमारे ५५ हजार लिटर डिझेल दररोज लागते. यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा भरणा तेल कंपन्यांना रोजच्या रोज करावा लागतो. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाºया महामंडळाकडून तेल कंपन्यांचे पुरेसे देयक अदा केले नसल्याने अपेक्षित डिझेल प्राप्त होत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून विभागातील बसेसला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. रविवारी दुपारनंतर डिझेल तुटवड्याची झळ बसू लागल्याने काही फेºया बंद करण्याची वेळ आली. तातडीची गरज म्हणून जिल्ह्यातील तीन डेपोंमधून प्रत्येकी ५० हजार लिटर्स डिझेल तातडीने मागविण्यात आले.
आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाºया महामंडळाच्या नाशिक विभागालादेखील गेल्या दोन दिवसांपासून झळ सोसावी लागत आहे. रविवारी दुपारनंतर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने काही मार्गांवरील बसेसच्या फेºया कमी करण्यात आल्या. सोमवारी मात्र संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली. बाहेरगावाहून आलेल्या बसेसदेखील डिझेल नसल्यामुळे नाशिकमध्येच अडकून पडल्या होत्या. जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या गाड्यांनादेखील डेपोत थांबविण्यात आले. गाड्याच धावत नसल्यामुळे चालक-वाहकांना सक्तीची रजा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा सारा प्रकार सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण बसयंत्रणा कोलमडून पडली होती.
तेल कंपन्यांना वेळेत बिले अदा केली जात नसल्यामुळे बसेससाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याची चर्चा महामंडळातील कर्मचाºयांमध्ये सुरू आहे.
फक्त एक  दिवसाचा प्रश्न मिटला
सोमवारी दुपारनंतर जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यातील बसेस नाशिकमध्येच अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. बाहेरगावच्या बसेस नसल्यामुळे स्थानकांमध्येही गोंधळ निर्माण झाल्याने सायंकाळच्या सुमारास तातडीने एक टॅँकर डिझेल मागविण्यात आले. मात्र ही केवळ तात्पुरती व्यवस्था आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत विभागातील १३ डेपोंसाठी डिझेलचे नियोजन केले जाईलही, मात्र बुधवारी पुन्हा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बसेस सुविधा बंद पडण्याची शक्यता आहे.
विभागीय एसटी कार्यालयात वाहतूक नियंत्रक कोण हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दोन अधिकारी या पदासाठी दावे करीत आहेत. विभाग नियंत्रकांनी वाहतूक अधिकारी म्हणून ज्यांचा क्रमांक माध्यमांना सांगितला त्यांना संपर्क करूनही त्यांचा भ्रमणध्वनी दिवभर बंद होता. विभाग नियंत्रक मैंद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते रजेवर असल्याने त्यांनीही भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही.
येत्या मार्च महिन्यात कामगार करार करावा लागणार आहे. त्यामुळे महामंडळाकडून तोटा उभा केला जात आहे. वास्तविक महामंडळ तोट्यात नाही तर कामगारांनी काही मागण्यांची वेळ आली की महामंडळ तोटा असल्याचे दाखवितात. कामगारांचे वेतन, डिझेल, गाड्यांचे सुटे भाग अशा कोणत्याच कामासाठी निधी दिला जात नाही. दुसरीकडे अनावश्यक खर्च आणि खासगी धोरण थांबविले पाहिजे.
- कैलास कराड, महाराष्टÑ एस.टी. ड्रायव्हर, कंडक्टर, मेकॅनिक युनियन

Web Title:  Diesel buses 'break'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.