प्रेयसीच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत पेटविले ; पिडितेची प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 03:51 PM2019-09-10T15:51:39+5:302019-09-10T15:53:34+5:30
नाशिकच्या आडगाव शिवारात राहणाऱ्या तरुणाने प्रेयसी बरोबर झालेल्या वादातून तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आडगाव शिवारातील दुशिंगे मळ्यात सोमवारी (दि.९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत प्रेयसी ९० टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले
नाशिक : आडगाव शिवारात राहणाऱ्या तरुणाने प्रेयसी बरोबर झालेल्या वादातून तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आडगाव शिवारातील दुशिंगे मळ्यात सोमवारी (दि.९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत प्रेयसी ९० टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेयसीला जिवंत पेटविणाºया प्रियकरावर आडगाव पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला पोलिसानीअटक केली आहे.
येवला तालुक्यातील खामगाव (पाटी) येथे राहणाºया पिडितेच्या भावाने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार कोणार्कनगर येथे राहणाºया प्रवीण कृष्णा डोईफोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ३२ वर्षीय पिडिता गंभीर भाजल्याने तिची प्रकृती चिंताजणक असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्कनगर येथे राहणाऱ्या प्रवीण डोईफोडे व पिडितेचे गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते त्यातून प्रवीणचे पिडिता राहत असलेल्या दुशिंगे मळ्यात घरी येणे जाणे होते. सोमवारी (दि.९) सायंकाळी संशयित आरोपी प्रवीण पिडितेच्या घरी आला असताना दोघांत वाद झाले. त्यातून संतापलेल्या प्रवीण याने प्रेयसीच्या अंगावर डिझेल ओतले व त्यानंतर अंगावरचा ड्रेस फाडला व तो गॅसवर पेटवून तिच्यावर टाकून पेटवून दिला. या घटनेत प्रेयसी ९० टक्के भाजली गेली. घटनेनंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आडगाव पोलिसांनी संशयित प्रविण डोईफोडे याला अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी पंचवटी फुलेनगरमध्ये अशाच प्रकारे एका प्रियकराने पत्नीसह तिच्या मुलीला व नातिला पेटवून देत जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली होती. सोमवारच्या घटनेने जळीतकांडाची पुनरावृत्ती झाली असून दिवसेंदिवस महिवांवरी अत्याचार वाढत असल्याचे दिसून येतआहे.दरम्या, पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.