मयत कर्मचाऱ्याच्या वेतन भत्त्यातील फरक लाटला परस्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:02 PM2020-05-27T22:02:46+5:302020-05-27T23:54:41+5:30

ओझर : आशिया खंडात सर्वाधिक अग्रेसर असलेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मयत कर्मचाºयाचे सातव्या वेतन आयोगातील सुमारे एक लाख वीस हजार रुपये फरकाची रक्कम परस्पर काढून त्याची योग्य विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 The difference in the salary allowance of the deceased employee corresponded to the wave | मयत कर्मचाऱ्याच्या वेतन भत्त्यातील फरक लाटला परस्पर

मयत कर्मचाऱ्याच्या वेतन भत्त्यातील फरक लाटला परस्पर

googlenewsNext

ओझर : आशिया खंडात सर्वाधिक अग्रेसर असलेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मयत कर्मचाºयाचे सातव्या वेतन आयोगातील सुमारे एक लाख वीस हजार रुपये फरकाची रक्कम परस्पर काढून त्याची योग्य विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मयत पारस लखीचंद कोचर हे वीस वर्षांपासून बाजार समितीत कामास होते. सप्टेंबर २०१६ ला त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी २०१५ ला बाजार समितीत सभापती दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत २०१४ साली केंद्राने अंमलात आणलेल्या महागाई भत्तावेतन देण्याचे ठरवले होते. तशी मागणी संचालक भास्कर बनकर यांनी केली होती. त्याची रक्कम जवळपास एक कोटी ऐंशी लाख होती. त्यामुळे त्याला दोन टप्प्यात विभागले गेले. २०१५ आॅक्टोबरमध्ये दिवाळीत पहिला फरक सर्व कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आला. तेव्हा कोचर हे हयात असल्याने त्यांना ती रक्कम मिळाली. त्यानंतर २०१७ ला जेव्हा दुसरा हप्त्याची रक्कम जमा करण्याचे ठरले तेव्हा कोचर यांचे २०१६ लाच निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या वाट्याची एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम ही सचिव संजय पाटील यांनी कर्मचारी जयवंत तेलंग यांच्या अ‍ॅक्सिस बँक खाते क्र. ५११०१०१०००२९६३४ या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप कोचर यांच्या पत्नी शर्मिला यांनी केला आहे.
सचिव संजय पाटील व जयवंत तेलंग यांनी जे संगनमत करून रकमेची विल्हेवाट लावल्याने आमच्या कुटुंबाची मोठी फसवणूक झाल्याचे शर्मिला कोचर यांनी अर्जात
म्हटले असून, याबाबत तालुका व जिल्हा निबंधकांकडे दाद मागितली आहे.
-----------------------
माझ्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. आमची परिस्थिती हलाखीची असल्याने मी सभापती, सचिव यांना नियमाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या दुसºया हप्त्याची रक्कम मिळावी यासाठी विनंती केली. कोणीही यात मला दाद दिली नाही. यानंतर मला माहिती मिळाली की सचिवांनीच तेलंग यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. अफरातफर करणाºया संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून इतर कुणा वारसदाराला त्रास होणार नाही.
- शर्मिला कोचर
(मयत कर्मचाºयाची पत्नी)
------------------------------------------------
पारस कोचर हे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. सन २०१५ साली त्यांच्यावर निफाड अर्बन बँकेच्या कर्जाची रक्कम काही प्रमाणात थकीत होती. त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने बँकेचे कर्मचारी बाजार समितीत वसुलीसाठी अटक वॉरंट घेऊन आले, तेव्हा मी त्यांची हमी घेऊन पन्नास हजार रु पये भरले होते. सदर रक्कम काढण्यात आली हे खरे जरी असले तरी त्यात आम्ही कोणतीही अफरातफर केलेली नाही.
- संजय बी. पाटील, सचिव, पिंपळगाव बाजार समिती

 

Web Title:  The difference in the salary allowance of the deceased employee corresponded to the wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक