पोलीस प्रशिक्षणार्थींचा वेगळा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:36 AM2018-08-12T00:36:56+5:302018-08-12T00:37:47+5:30

पोलिसांच्या बाबतीत जनमानसात वेगवेगळे प्रवाह असले तरी त्यांच्यातही कोणासाठी काहीतरी करण्याची भावना व प्रेरणा असते. यातूनच महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींनी नाशिक येथील निरीक्षणगृह व बालगृहाच्या मुलांसाठी ८१ हजार रुपयांची देणगी देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या पैशातूनच दरवर्षी १२ आॅगस्ट व १२ सप्टेंबर या दिवशीच्या भोजनाची जबाबदारी कायमस्वरूपी स्वीकारली आहे.

A different model of the police trainees | पोलीस प्रशिक्षणार्थींचा वेगळा आदर्श

पोलीस प्रशिक्षणार्थींचा वेगळा आदर्श

googlenewsNext

नाशिक : पोलिसांच्या बाबतीत जनमानसात वेगवेगळे प्रवाह असले तरी त्यांच्यातही कोणासाठी काहीतरी करण्याची भावना व प्रेरणा असते. यातूनच महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींनी नाशिक येथील निरीक्षणगृह व बालगृहाच्या मुलांसाठी ८१ हजार
रुपयांची देणगी देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या पैशातूनच दरवर्षी १२ आॅगस्ट व १२ सप्टेंबर या दिवशीच्या भोजनाची जबाबदारी कायमस्वरूपी स्वीकारली आहे.
येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत पोलीस उपनिरीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांना प्रशिक्षण दिले जाते. यावर्षी येथे ११५ व ११६ या दोन बॅचचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणादरम्यान त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच्या व्याख्यात्यांबरोबर प्रमुख पाहुण्यांना बोलावून त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते.
गेल्या महिन्यात निरीक्षणगृह व बालगृहाचे मानद सचिव चंदुलाल शाह यांना व्याख्याता म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना शाह यांनी निरीक्षणगृह व बालगृहाबाबतची माहिती व या ठिकाणची परिस्थिती कथन केली. या ठिकाणी असलेल्या मुलांची मानसिकता काय असते, त्यांना कशा प्रकारे सांभाळावे
लागते याचे सविस्तर विवेचन केले.
या देणगीची आता मुदत ठेव केली जाणार आहे. यातून येणाऱ्या व्याजातून निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथील ८५ मुलांना गणवेशही देण्यात आला आहे.
यावेळी पोलीस अकादमीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनय थिगळे, एडीआय राजेंद्र ठाकरे, प्रशिक्षणार्थी मेहबूब तडवी,
नामदेव आंगज व हितेश शाह उपस्थित होते.
आपुलकीची भावना
शाह यांनी व्याख्यानातून मांडलेली मुलांची परिस्थिती ऐकून प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्यात निरीक्षण व बालगृहातील मुलांबद्दल आपुलकी निर्माण होऊन त्यांनी या मुलांना मदत करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्याप्रमाणे ११५ बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॅप्टनकडे ८१ हजार रु पये गोळा करून दिले व हे पैसे त्यांनी सचिव चंदुलाल शाह यांच्याकडे सुपुर्द केले .

Web Title: A different model of the police trainees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक