विधानसभा निवडणूक महायुतीसाठी अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:45 AM2019-10-06T00:45:26+5:302019-10-06T00:45:45+5:30

नाशिक : भाजप, शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतानाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी (दि.५) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

Difficult for Assembly Election Mahayuti | विधानसभा निवडणूक महायुतीसाठी अवघड

विधानसभा निवडणूक महायुतीसाठी अवघड

Next
ठळक मुद्देरामदास आठवले : अपेक्षित जागा न मिळाल्याने व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भाजप, शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतानाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी (दि.५) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
महायुतीच्या जागावाटपात आपण देवळाली, भुसावळसह आणखी काही जागांची मागणी केली होती, परंतु उत्तर महाराष्ट्रात आम्हाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आरपीआयवर अन्याय झाल्याची भावना पसरल्याने प्रचंड नाराजी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. महायुतीत आरपीआयला किमान १० जागा मिळण्याची अपेक्षा होती, मात्र आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्या आहेत. त्यातही मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे आमच्या वाट्याला केवळ पाच जागा येणार असल्याने या जागेचा तिढा सोडविण्यासाठी आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आपल्यावर अन्याय होत असला तरी सत्तेत सहभागी होऊन अन्याय दूर करता येणार असल्याचे सांगतानाच आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जागा जिंकण्यासाठीच आपण भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘वंचित’ला लोकसभेप्रमाणे प्रतिसाद नाही
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेत चांगले मतदान झाले असले तरी विधानसभा निवडणुकीत त्यांना लोकसभेप्रमाणे प्रतिसाद मिळणार नसल्याचे भाकीत रामदास आठवले यांनी केले. पक्षांतरामुळे सध्याच्या स्थितीत कोण कोणत्या पक्षात आहे हेच सांगणे कठीण असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणी नेते उरले नसल्याने या निवडणुकीत महायुतीला २४० ते २५० जागा मिळून पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, तर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तविली. युतीत नेहमीच गडबड
भाजप आणि शिवसेनेदरम्यान विविध मुद्द्यांवरील मतभेद सर्वश्रुत असून, गतपंचवार्षिकमध्ये दोन्ही पक्ष सत्तेत असतानाही ते प्रकर्षाने दिसून आले असताना युतीत नेहमीच गडबड असल्याचे सांगतानाच आपणच मध्यस्थी करून ही गडबड दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकत्रीकरणाची कल्पनाही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आपणच आणल्याने आज समाजात परिवर्तन दिसून येत असल्याचेही आठवले म्हणाले.

Web Title: Difficult for Assembly Election Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.