आयटीआयचे प्रवेशअर्ज भरण्यात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:03 AM2018-06-27T02:03:45+5:302018-06-27T02:03:51+5:30
नाशिक : सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन रजिस्ट्रेशन करून अर्ज निश्चित करताना संकेतस्थळाच्या धीम्या गतीमुळे अडचणी येत असून, अर्ज भरता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर कॅफेच्या फेºया मारावा लागत आहेत.

आयटीआय प्रवेशाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या सुरू झाली असून, यावर्षी विविध २७ व्यवसाय अभ्यासक्र माच्या ६२ तुकड्यांमधील एक हजार ३०२ जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. परंतु, प्रवेशप्रक्रियेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवत असल्याने विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन क रून अर्ज निश्चित करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या प्रामुख्याने दुपारच्या वेळी जाणवत असून, सकाळी व सायंकाळी अर्ज भरणाºया विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने संकतस्थळ सुरळीत चालते. संकेतस्थळाची अडचणी आल्यानंतर काही वेळानंतर प्रयत्न करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन आयटीआयतर्फे करण्यात आले आहे.माहितीसाठी स्वतंत्र कक्ष विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाची माहिती देण्यासाठी संस्थेत स्वतंत्र विभागाची व्यवस्था करण्यात आली असून आॅनलाइन प्रवेशाची माहिती, अर्ज कसा भरावा, कॅप राउंड, प्रवेश निश्चिती याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असून, विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास संस्थेत संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य सुभाष कदम यांनी केले आहे.