गळीत हंगाम सुरू करण्यास अडचणी

By admin | Published: January 3, 2017 10:57 PM2017-01-03T22:57:28+5:302017-01-03T22:57:50+5:30

राहुल अहेर : वसाका कार्यक्षेत्रावर कामगारांशी चर्चा

Difficulties in starting a crushing season | गळीत हंगाम सुरू करण्यास अडचणी

गळीत हंगाम सुरू करण्यास अडचणी

Next

लोहोणेर : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक अडचणीच्या काळात व नोटाबंदीमुळे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास वेळेवर कर्जपुरवठा न झाल्याने वसाकाचा सन २०१६-१७चा चालू गळीत हंगाम सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी अजूनही गळीत हंगाम सुरू करण्याच्या अपेक्षा कायम आहेत. याबाबत लवकरच सर्वांना विश्वासात घेऊन कारखान्याच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आमदार डॉ. राहुल अहेर यांनी देवळा येथील पत्रकार परिषदेत दिली.
वसाकाच्या गळीत हंगामाबाबत कार्यक्षेत्रात व सभासदांमध्ये उलट-सुलट चर्चा होत असल्याने याबाबत खरी पार्श्वभूमी जनतेसमोर यावी, या उद्देशाने वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी देवळा विश्रामगृहावर पत्रकार परिषद बोलावून कारखाना व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट केली. राज्य शासनाचे हमीपत्र, राज्य सहकारी बँकेने केलेल्या थकीत कर्जाचे पुनर्गठन व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेले अर्थसहाय्य यामुळे तब्बल साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर मागील वर्षी वसाकाची चिमणी सर्वांच्या सहकार्याने सुरू करून संपूर्ण राज्यात वसाका पॅटर्नची चर्चा झाली होती.  याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा प्राधिकृत अधिकारी केदा अहेर, अभिमन पवार, सहायक निबंधक संजय गिते आदि उपस्थित होते. दरम्यान, पत्रकार परिषदेअगोदर वसाकाच्या कामगारांनी आमदार डॉ. अहेर यांची भेट घेऊन कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली. (वार्ताहर)






 

Web Title: Difficulties in starting a crushing season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.