भावडे शाळेचे पाऊल डिजिटलकडे
By admin | Published: April 7, 2017 01:11 AM2017-04-07T01:11:07+5:302017-04-07T01:11:22+5:30
देवळा : तालुक्यातील भावडे येथील प्राथमिक शाळेत डिजिटल साहित्य, साउंड सिस्टीम लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
देवळा : तालुक्यातील भावडे येथील प्राथमिक शाळेत डिजिटल साहित्य, साउंड सिस्टीम लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
देवळा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी एस. ए. पारधी अध्यक्षस्थानी होत्या. जि. प. सदस्य नूतन अहेर, पंचायत समिती सभापती केशरबाई अहिरे, उपसभापती सरला जाधव, शांताबाई पवार, सुनील आहेर, बापू जाधव, सरपंच बाळू माळी, उपसरपंच रमण भदाणे, शिवाजी मोरे, रोहिणी मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी विजया फलके, संजय ब्राह्मणकार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अनिल सावंत यांनी प्रस्तावनेत शाळेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. भावडे देवळा येथील वस्तीवरील प्राथमिक शाळेस ग्रामस्थांनी लोकसहभागातून साउंड सिस्टीम व उपशिक्षक अनिल सावंत यांनी आपल्या स्वर्गीय मातोश्रीच्या स्मृतिदिनानिमित्त शाळेला टॅब भेट दिला.
ग्रामस्थांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुख्याध्यापक कल्पना सोनवणे व अनिल सावंत यांच्याकडे वस्तू सुपूर्द केल्या. गटशिक्षणाधिकारी एस. ए. पारधी यांनी शिक्षण विभागामार्फत राबवित असलेल्या उपक्रमांविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब भदाणे, निवृत्ती वाघ, कैलास आहेर, राकेश गुंजाळ, शांताराम चव्हाण, दिलीप चव्हाण, शरद भदाणे, कडू खैर, नितीन गांगुर्डे, नितीन भामरे, नानाजी भदाणे, संजय आहेर, दत्तू वाघ, संदीप शिंदे, दगडू गायकवाड, पंकज जाधव यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पी. के. आहेर यांनी सूत्रसंचालन, तर मुख्याध्यापक कल्पना सोनवणे यांनी आभार मानले. (वार्ताहर)