दिगंबर आखाड्याचा चौथरा हटविला

By admin | Published: February 23, 2016 12:14 AM2016-02-23T00:14:52+5:302016-02-23T00:18:24+5:30

तपोवनातील प्रकार : साधू-महंतांसह भाविक संतप्त

Digambar Akhada Chautrala was deleted | दिगंबर आखाड्याचा चौथरा हटविला

दिगंबर आखाड्याचा चौथरा हटविला

Next

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील आरक्षित जागेवर दिगंबर आखाड्याने चरणपादुकांसाठी उभारलेल्या चौथऱ्याचे बांधकाम हटविल्याने साधू-महंतांसह भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी या चौथऱ्याचे बांधकाम हटविले असून, ते बांधकाम मनपा प्रशासनाने की अन्य कोणी हटविले याबाबत स्पष्टोक्ती नाही; परंतु सदरच्या चौथऱ्याचे बांधकाम हे मनपा प्रशासनानेच केले होते व नंतर मनपानेच हटविल्याचा आरोप साधू-महंतांसह भाविकांनी केला
आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत दिगंबर, निर्वाणी व निर्माेही अशा तिन्ही आखाड्यांनी चरणपादुका स्थापन करण्यासाठी प्रशासनाकडून मिळालेल्या जागेवर चौथरे उभारले होते. कुंभमेळा आटोपल्यानंतर या चरणपादुकांच्या ठिकाणी देवदेवतांच्या मूर्ती उभारल्या होत्या व त्या मूर्तींचा पूजाविधी व देखभालीची जबाबदारी साधू-महंतांकडे दिली होती. दिगंबर आखाड्यानेदेखील चरणपादुकांसाठी चौथरा बांधला होता; मात्र दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता चौथरा हटविण्याचे काम केले. सध्या तपोवनातील मुरूम उचलण्याचे तसेच शेतजमिनी सपाटीकरणाचे काम सुरू असून, ते काम करतानाच चौथरा हटविला असावा असे बोलले जात आहे. सध्या तपोवनात निर्वाणी व निर्माेही या आखाड्यांच्या चरणपादुकांसाठी असलेले चौथरे व्यवस्थित आहेत; मात्र केवळ दिगंबर आखाड्याच्या चरणपादुकांचा चौथरा हटविल्याने संताप व्यक्त केला जात
आहे. (वार्ताहर)

Web Title: Digambar Akhada Chautrala was deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.