ओझे येथे बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 02:13 PM2019-12-23T14:13:18+5:302019-12-23T14:13:54+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. रविवारी लक्ष्मण छबू जोपळे गट नं ५१ यांच्या वस्तीवर वासरू फस्त केले होते. त्याच वस्तीवरील सुखदेव खंडू गोजरे यांचे वासरूही बिबट्याने ठार केले आहे. बिबटयाचे आगमन होताच आवाज केल्यांमुळे तो माघारी फिरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बिबटया आला त्यावेळी तेथे गाय पण होती, मात्र बाहेर माणसे असल्यांमुळे गायीचे प्राण वाचले. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त होत करून वनचौकी बसविण्याची मागणी लक्ष्मण जोपळे व ग्रामस्थांनी केली आहे . ओझे परिसरामध्ये अनेक ठिकाणी गाय, वासरू,कुत्रे मारण्याच्या घटना घडत आहे. यासाठी वनविभागाने कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे, मात्र वनविभागाकडून बिबटया पकण्यासाठी कुठलीही मोहिम हाती घेतली जात नाही . वनविभागाने त्वरित या ठिकाणी पिंजरा बसवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.