खर्डेच्या पवनने बनवले टाकाऊतून खोदाई यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:03 PM2019-04-08T18:03:19+5:302019-04-08T18:03:24+5:30
खर्डे : देवळा तालुक्यातील अतिदुर्गम खर्डे येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या पवन भारत जगताप या विद्यार्थ्याने पुठ्यापासून मोटारसायकल बनवली.
Next
ठळक मुद्देपवनने निकामी पृष्ठे, सलायनच्या नळ्या व इंजेक्शनचा वापर करून जमीन खोदण्याचे मशीन बनवले.
खर्डे : देवळा तालुक्यातील अतिदुर्गम खर्डे येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या पवन भारत जगताप या विद्यार्थ्याने पुठ्यापासून मोटारसायकल बनवली. वेगवेगळ्या प्रकारच्या नळ्यांमध्ये हवेच्या दाबाचा उपयोग करून जमीन खोदण्याच्या मशीनची कलाकृती तयार केली. त्याच्या या कलाकृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
पवन हा खर्डेचे पोलीसपाटील भारत जगताप यांचा मुलगा आहे. लहान वयात पवनने स्वत: तयार केलेली साधने त्याच्यातील संशोधकतेची नांदी असल्याचे बोबले जात आहे.
फोटोओळ- खर्डे येथील पवन जगताप या विद्यार्थ्यांने बनवलेली मोटारसायकल. (08खर्डे पवन जगताप)