डिजिटल साक्षरता प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:26 AM2020-01-02T00:26:47+5:302020-01-02T00:27:18+5:30
मालेगाव तालुक्यातील सोनज येथे राज्य महिला आयोग, मुंबई व सेवाम संस्था सोनज यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण घेण्यात आले. उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या नाशिक विभागीय सदस्य रोहिणी नायडू यांनी केले. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती आणि विविध उपक्रमांची माहिती दिली.
मालेगाव : तालुक्यातील सोनज येथे राज्य महिला आयोग, मुंबई व सेवाम संस्था सोनज यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण घेण्यात आले. उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या नाशिक विभागीय सदस्य रोहिणी नायडू यांनी केले. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती आणि विविध उपक्रमांची माहिती दिली.
उद्घाटन सेवाम संस्थेच्या प्रेसिडेंट संध्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. महिला बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे कुणाल परदेशी व महिला समुपदेशन केंद्राच्या अपेक्षा पगार, मिलिंद पोफळे, महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक विष्णू शेवाळे, कृषी पर्यवेक्षक रत्ना सूर्यवंशी, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या पर्यवेक्षक श्रीमती के. आर. मोरे, श्रीमती ए. पी. सावंत, श्रीमती जी. के. रॉय, श्रीमती यू. बी. ठोके, श्रीमती ए. व्ही. देवरे, श्रीमती ए. पी. बोरसे, श्रीमती आर. डी. विश्वकर्मा, श्रीमती के. बी. सुरंजे, विनोद जाधव व उदय सरदार आदी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी १५६ महिलांनी सहभाग नोंदविला. प्रास्ताविक मोहन निकम यांनी केले.
राज्य महिला आयोगाच्या प्रशिक्षक मानसी रायकर यांनी उपस्थितांना डिजिटल साक्षरता म्हणजे काय, डिजिटल साक्षरतेचे फायदे, डिजिटल अॅप - तेजस्विनी, आपले सरकार, उमंग यांचा वापर, डिजिटल देयकांचे फायदे आणि प्रकार, सुरक्षित डिजिटल देयके अदा करण्याबाबत सूचना, भीम अॅपबाबत पायाभूत माहिती, पैसे पाठविण्याच्या पद्धती, शिल्लक तपासणी, भीम अॅपद्वारे बिले भरणे याबाबत मार्गदर्शन केले.