दिव्यांग सन्मानासाठी ‘डिग्निटी राइड’
By admin | Published: May 22, 2017 02:15 AM2017-05-22T02:15:54+5:302017-05-22T02:16:04+5:30
नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे रविवारी (दि. २१) दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलेली ‘डिग्निटी राइड’ उत्साहात संपन्न झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे रविवारी (दि. २१) दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलेली ‘डिग्निटी राइड’ उत्साहात संपन्न झाली. राजीव गांधी भवन येथून सुरू झालेल्या या रॅलीचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शहरातील तीनचाकी सायकल चालवून आपली दैनंदिन कामे करणाऱ्या विशेष नागरिकांना समाजात प्रतिष्ठेने जगता यावे तसेच कुठलाही कमीपणा वाटू नये यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राइडमधून प्रतिष्ठेने सन्मानासह जगा, असा संदेश देण्यात आला. रविवारी सकाळी राजीव गांधी भवन, मॅरेथॉन चौक, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, जुने सीबीएस, त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांनी यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या व्यक्ती नाशिक सायकलिस्ट परिवाराचाच एक भाग असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी. उपाध्यक्ष योगेश शिंदे, मनीषा भामरे, डॉ. मनीषा रौंदळ, सोफिया कपाडिया, नीता नारंग, वैभव शेटे, विशाल उगले, नितीन नागरे आदि उपस्थित होते.