दीक्षीच्या शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:25 PM2020-12-13T23:25:12+5:302020-12-14T01:20:58+5:30

ओझर : निफाड तालुक्यातील दीक्षी येथील रामदास भास्कर शिंदे ( ४५ ) या तरुण शेतकऱ्याने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून आपल्या मळ्यातील निवारा शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

Dikshi farmer commits suicide | दीक्षीच्या शेतकऱ्याची आत्महत्या

रामदास शिंदे

Next
ठळक मुद्देकर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून गळफास

ओझर : निफाड तालुक्यातील दीक्षी येथील रामदास भास्कर शिंदे ( ४५ ) या तरुण शेतकऱ्याने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून आपल्या मळ्यातील निवारा शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांच्या एकत्र कुटुंबाची सुमारे ६ एकर शेती होती. कुटुंबावर दीक्षी विविध कार्यकारी सोसायटीचे ७ लाख, ओझर नागरी सहकारी पतसंस्थेचे ९ लाख, सोनेतरण ८ लाख, हातउसने असे सर्व मिळून सुमारे ३५ लाख रुपयांचे कर्ज होते. शिवाय सततच्या नापिकीमुळे त्यांनी या सर्व परिस्थितीला कंटाळूनआपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

 

Web Title: Dikshi farmer commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.