पंचवीस वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांची "दिल दोस्ती दुनियादारी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 12:33 AM2021-05-04T00:33:08+5:302021-05-04T00:33:18+5:30

पॉझिटिव्ह स्टोरी जानोरी : सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाची अवघड परिस्थिती असूनही माणुसकी व मैत्रीची भावना टिकून आहे, याचा प्रत्यय ...

"Dil Dosti Duniyadari" by classmates 25 years ago | पंचवीस वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांची "दिल दोस्ती दुनियादारी"

पंचवीस वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांची "दिल दोस्ती दुनियादारी"

Next
ठळक मुद्देमोहाडी : कोरोना पीडित मित्राला केली लाखमोलाची मदत

पॉझिटिव्ह स्टोरी

जानोरी : सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाची अवघड परिस्थिती असूनही माणुसकी व मैत्रीची भावना टिकून आहे, याचा प्रत्यय मोहाडी (ता. दिंडोरी) येथील मित्रांनी केलेल्या लाखमोलाच्या मदतीतून गावकऱ्यांना आला. या वर्गमित्रांची ही दिल दोस्ती दुनियादारी पाहून ग्रामस्थांनीही मैत्रीचे कौतुक केले.

मोहाडी येथील चंद्रकांत अहिरे यांना व त्यांच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली. अहिरे हे विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक म्हणून देवळाली येथील माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत. त्यामुळे पुरेसा पगार नाही व घरची परिस्थितीही बेताचीच. या परिस्थितीत ते नाशिक येथील कोविड सेंटरला दाखल झाले. तेथे त्यांनी चार दिवस उपचार घेतले. परंतु तेथे पुरेशा सुविधा नसल्याने त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने तिथून हलविणे गरजेचे होते. ही बाब त्यांचे सन १९९५ च्या दहावीच्या बॅचचे वर्गमित्र असणाऱ्या ह्यके.आर.टी.मोहाडीह्ण या व्हॉट्सॲप ग्रुपवर समजली. तेव्हा वर्गमित्र पुढे सरसावले व त्यांनी सर्वांनी अहिरे यांना त्यांचा स्वाभिमान न दुखवता मदत करण्याचे ठरविले.

बघता बघता एकाच दिवसात फोन पे च्या माध्यमातून लाखाच्या वरती रक्कम जमा झाली. त्यात शेतकरी, व्यावसायिक व नोकरदार वर्गमित्रांबरोबरच सासरी गेलेल्या वर्ग मैत्रिणींनीही आपला मोठा सहभाग नोंदविला. नंतर मित्रांनी त्यांना इतरत्र हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे ठरविले. परंतु ऑक्सिजन बेडची आवश्यकता असल्याने ते बेड मिळू शकत नव्हते.

शेवटी वर्गमित्रांनी अहिरे यांची आरोग्यविषयक परिस्थिती जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांच्या कानी घातली. परंतु ऑक्सिजन बेड उपलब्धतेची कठीण परिस्थिती असतांनाही पवार यांनी दाखल करून घेण्याची तयारी दाखविली. त्या अगोदरच दुर्दैवाने अहिरे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे अहिरे व त्यांच्या आईला उपचारार्थ दाखल करण्यात आले.

त्यानंतर गेले सहा दिवस वर्गमित्रांनी कुटुंबातील सदस्यासारखे रेमडेसिविर इंजेक्शन्स व इतर मेडिसिन,जेवणाच्या डब्यासह उर्वरित रोख रक्कम दिली. अहिरे यांच्या अडचणीच्या काळात सर्व प्रकारची मदत करून वर्गमित्र व त्याच्या कुटुंबाला लाख मोलाची मदत केली.

ग्रामस्थांकडून कौतुक
अहिरे यांचे दहावीचे वर्गमित्र डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे शिक्षण अधिकारी डॉ. नानासाहेब पाटील, वैभव पाटील, शंकर ठाकूर,शरद झोमण, सुनील मौले, दिगंबर शेळके, सतीश देशमुख यांनी आर्थिक मदतीबरोबरच आपला जीव धोक्यात घालून कुटुंबातील सदस्यासारखी पूर्ण कालावधीत प्रत्यक्ष मदत केली. आता अहिरे व त्यांच्या मातोश्री पूर्ण बरे होऊन घरी आले आहेत. विद्यार्थ्यांनी पंचवीस वर्षांपूर्वीची आठवण ठेवून आपल्या अडचणीत आलेल्या मित्राला मदत केली त्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

Web Title: "Dil Dosti Duniyadari" by classmates 25 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.