समस्यांच्या विळख्यात सातपूर पोलीस वसाहत जीर्ण इमारत।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 09:51 PM2020-09-05T21:51:40+5:302020-09-06T00:56:57+5:30
सातपूर : सातपूर पोलीस ठाणे आवारात पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या इमारती अतिशय जुन्या आणि जीर्ण झाल्या असून, त्यामुळे या इमारतींच्या स्लॅबच्या छताचे प्लास्टर निखळून पडत आहे. सांडपाण्याच्या चेंबरची दुरवस्था झाल्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : सातपूर पोलीस ठाणे आवारात पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या इमारती अतिशय जुन्या आणि जीर्ण झाल्या असून, त्यामुळे या इमारतींच्या स्लॅबच्या छताचे प्लास्टर निखळून पडत आहे. सांडपाण्याच्या चेंबरची दुरवस्था झाल्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
साधारणपणे १९७८ साली सातपूर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्याच काळात पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाºयांसाठी निवासाची सोय म्हणून पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस पाच बहुमजली इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतरच्या काळात इमारतींची देखभाल करण्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने सध्या इमारतींच्या चहूबाजूंनी गवत आणि झाडेझुडपे अस्ताव्यस्त वाढलेली आहेत. परिणामी या ठिकाणी डासांच्या उच्छादामुळे पोलीस कुटुंबीय प्रचंड हैराण होत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न कायम निर्माण होत असल्याची तक्रार केली जात आहे. या इमारतींत अनेक ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी त्यांचे लहान मुले राहतात, मात्र त्यांना विरंगुळ्याचे कोणतेही साधन या वसाहतीत नसल्याची तक्रार वारंवार करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण अथवा उद्यान नाही. पोलीस ठाणे आणि निवासी वसाहत यांच्यात खूप जागा असली तरी या जागेचा उपयोग कुटुंबीयांना अजिबात होत नाही. ही मोकळी जागा पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी,चारचाकी वाहनांनी व्यापलेली आहे. वर्षानुवर्षे पडून असलेली ही वाहने गंजलेल्या अवस्थेत आहेत. मोकळ्या जागेत एका बाजूला पोलीस कर्मचाºयांसाठी ग्रीन जिमचे व्यायामाचे साहित्य बसविण्यात आलेले असले तरी वाढलेले गवत आणि दगडांमुळे त्याचा उपयोग फारसा होत नसल्याचे महिलांनी सांगितले.पोलीस ठाण्याची इमारत खूपच जुनी झाल्याने या इमारतीच्या नूतनीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीचे ज्यावेळी बांधकाम सुरू होईल त्यावेळी या निवासी इमारतीदेखील नव्याने बांधण्यात येतील असे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे. या इमारतीतील खोल्या लहान असल्याने कुटुंबीयांना अडचण होत आहे. आता बांधकाम कधी सुरू होईल, याकडे लक्ष लागून आहे.