मायलेकीचा विनयभंग करत दमबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:29 AM2019-03-13T00:29:33+5:302019-03-13T00:31:15+5:30
शरणपूररोडवरील एका सार्वजनिक शौचालयाजवळ दोघा संशयित आरोपींनी एका मायलेकीचा विनयभंग करत दमबाजी केल्याची घटना घडली आहे. पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : शरणपूररोडवरील एका सार्वजनिक शौचालयाजवळ दोघा संशयित आरोपींनी एका मायलेकीचा विनयभंग करत दमबाजी केल्याची घटना घडली आहे. पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित फिर्यादीच्या राहत्या घरी संशयित दीपक मनोहर पवार (२६) आणि दीपक रतन घोलप (२२, दोघे रा. शरणपूररोड) यांनी विवाहितेच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. तसेच ‘तुझ्या मुलाला भोसकून टाकतो’ असा दम भरला. याप्रकरणी फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये तसेच विनयभंगाचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांनी दाखल केला आहे.