दिलीप कुमार यांनी नाशिकमधील मंदिराला केली होती आर्थिक मदत, 'या' मंदिराचे करून दिले होते बांधकाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 09:26 AM2021-07-08T09:26:22+5:302021-07-08T09:28:35+5:30
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे सन १९६१-६२ या काळात अभिनेते दिलीपकुमार व वैजयंतीमाला यांच्या सुपरहिट ठरलेल्या ‘गंगा-जमुना’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण येथील रोकडेवाड्यात, तसेच भैरवनाथ मंदिर आदी ठिकाणी जवळपास तीन वर्षे चालले होते.
Next
किसन काजळे -
नाशिक: इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे सन १९६१-६२ या काळात अभिनेते दिलीपकुमार व वैजयंतीमाला यांच्या सुपरहिट ठरलेल्या ‘गंगा-जमुना’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण येथील रोकडेवाड्यात, तसेच भैरवनाथ मंदिर आदी ठिकाणी जवळपास तीन वर्षे चालले होते. हाच रोकडेवाडा आजही तसाच उभा आहे. त्याचे मालक राजाभाऊ राेकडे यांनी चित्रीकरणात दिलीपकुमार यांनी वापरलेल्या सर्व वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. या वाड्याला आजही अनेक पर्यटक भेट देत असतात.
चित्रीकरण संपल्यानंतर दिलीपकुमार यांनी आपली आठवण म्हणून विठ्ठल-रुक्मिणी व श्रीकृष्ण मंदिराचे बांधकाम करून दिले होते.