मीणा यांना वाचविण्यासाठी शिष्टाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:35 AM2018-02-02T00:35:11+5:302018-02-02T00:36:47+5:30
नाशिक : समवयस्क व भारतीय प्रशासन सेवेतील सहकारी अधिकाºयाला वाचविण्यासाठी गुरुवारी थेट जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् व आमदार बाळासाहेब सानप यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व ग्रामसेवकांची एकत्रित बैठक घेऊन शिष्टाई करण्याचा प्रयत्न महसूल व ग्रामीण विकास यंत्रणेत चर्चेचा विषय झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची बदली झाल्यास त्यांच्या ‘करिअर’चा प्रश्न निर्माण होण्याची चिंंता लागून राहिलेल्या जिल्हाधिकाºयांनी या बैठकीत रुसलेल्या अधिकाºयांची मनधरणी करतानाच ‘यापुढे मीणा ‘चांगले’ वागतील मी त्यांना सांगतो’ असा शब्दही दिला, परंतु मीणा मात्र या बैठकीत ढिम्म बसून राहिल्याने अधिकाºयांचा त्यांच्यावर विश्वास बसणे कठीण झाले आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील दहा आमदारांनी एकत्र येत मीणा यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करून ग्रामसेवकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून, त्यात भाजपाच्या आमदारांचाही समावेश असताना आमदार बाळासाहेब सानप यांनी मीणा यांची बाजू घेतल्याने त्या निमित्ताने भाजपातील मतभेदही उघड झाले आहेत. अर्थात जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत झालेल्या ‘या बैठकीस आपण उपस्थित होतो हे प्रसिद्धी माध्यमांना सांगू नका’ असा सल्ला उपस्थितांना देण्यासही सानप विसरले नाहीत. त्यामुळे सानप यांच्या ‘मध्यस्थी’चा वेगवेगळा ‘अर्थ’ काढला जाऊ लागला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी तातडीने बोलविलेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, सर्व गटविकास व सहगटविकास अधिकाºयांबरोबरच ग्रामसेवक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे अधिकाºयांची जिल्हा परिषदेतील अनुपस्थिती केंद्रीय अर्थसंकल्पामुळे असल्याची चर्चाही या निमित्ताने पसरविण्यात आली होती. जिल्हाधिकारी व आमदार सानप यांच्या प्रमुख पुढाकाराने बोलविलेल्या या बैठकीत काही अधिकाºयांनी मीणा यांनी नाकारलेल्या फाईलीच पुराव्यासाठी सादर करून, मीणा यांचे वर्तन व वागणुकीबाबत तक्रारी केल्या. मीणा यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचेही सांगण्यात आले तर ग्रामसेवकांनीही उघड नाराजी व्यक्त केली. मीणा यांच्याविषयी तक्रारींचा पाढा वाचला जात असल्याचे पाहून अस्वस्थ झालेल्या जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांची मनधरणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
मीणा यांची तक्रारीवरून बदली झाल्यास त्यांच्या करिअरचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे तक्रारी करू नका, समन्वयातून मार्ग काढा, असा सल्ला जिल्हाधिकाºयांनी उपस्थिताना दिला तर सानप यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळविला. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत साºयांनीच नुसत्याच माना हलवून सहमती दर्शविली.आयएएस लॉबीचा आटापिटा
दीपककुमार मीणा यांच्या कारभाराबद्दल जिल्हा परिषदेचे अधिकारी, सदस्य, पदाधिकारी व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची तक्रार असल्यामुळे व त्यातही ग्रामसेवकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून असहकार आंदोलन पुकारलेले असताना या वादात विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी मध्यस्थी करणे अपेक्षित असताना जिल्हाधिकाºयांनी याकामी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मीणा व जिल्हाधिकारी राधाकृष्णन् दोघेही आयएएस असल्याने त्यातून हा पुढाकार घेतला गेला असण्याची चर्चा महसूल व ग्रामीण विकासचे अधिकाºयांमध्ये रंगली आहे. कारण यापूर्वी कधीही असा प्रकार घडला नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.