‘दमा दम मस्त कलंदर’ रंगला कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:34 PM2017-11-26T23:34:49+5:302017-11-27T00:34:51+5:30
दमा दम मस्त कलंदर..., मुहिंजा मारुवडा पधरे पट सुमन..., मुहिंजा यार मिठा... अशा एकापेक्षा एक सरस गीतांसह आयोलाल झुलेलाल... या गीतावरील समूहनृत्याने रंगलेल्या ‘सिन्धीअ जी शान ऐं सुरहाण’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
नाशिक : दमा दम मस्त कलंदर..., मुहिंजा मारुवडा पधरे पट सुमन..., मुहिंजा यार मिठा... अशा एकापेक्षा एक सरस गीतांसह आयोलाल झुलेलाल... या गीतावरील समूहनृत्याने रंगलेल्या ‘सिन्धीअ जी शान ऐं सुरहाण’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. निमित्त होते, सिंधी भाषा विकास परिषद व नाशिक जिल्हा सिंधी पंचायत फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदिवसीय सिंधी भाषा राष्टÑीय परिषदेच्या समारोपाचे. रविवारी (दि.२६) भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात संध्याकाळी ‘...शान ऐं सुरहाण’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने परिषदेचा समारोप झाला. यावेळी शहरातील विविध उपनगरांमध्ये राहणाºया सिंधी समाजाच्या सुमारे शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपले कलागुण सादर केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गुरूमुख जगवाणी, परिषदेचे अध्यक्ष अजित मन्याल, शीतलदास बालाणी, अर्जुनदास कठपाल, कन्हैयालाल कालाणी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी भगवान झुलेलाल यांना वंदना सादर करण्यात आली. यानंतर गुरू हरियाणी यांनी उपस्थितांमधून १५ ते १७ वयोगटातील मुलांना व्यासपीठावर बोलावून बॉलिवूडच्या हिंदी संवादाचे सिंधी भाषेत भाषांतर सादरीकरणाची स्पर्धा पार पाडली. यावेळी शालेय मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हरियाणी यांनी सांगितलेल्या संवादाचे सिंधीत भाषांतर केले. दरम्यान, लघुनाटिकेच्या माध्यमातून सिंधी भाषेच्या संवर्धनाचा संदेश मुलांनी देण्याचा प्रयत्न केला. काठेगल्ली परिसरातील मुलांच्या ग्रुपने आयोलाल झुलेलाल... या गीतावर समूहनृत्य सादर करत कार्यक्रमात रंग भरला. त्यानंतर देवळाली परिसरातील मुलांनी जिया मुहिंजी सिंध... या गीतावर नृत्य केले. नाशिकरोड भागातील मुलांनी समूहगायन सादर केले तर देवळालीच्या मुलांच्या दुसºया ग्रुपने लघुनाटिकेद्वारे सिंधी समाजाचा विवाह सोहळा रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न केला. अशा एकापेक्षा एक सरस गीतगायन व समूहनृत्याने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. सूत्रसंचालन देवी लखमियानी, मानसी आडवाणी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.