राजदेरवाडी ते पैठण पायी दिंंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:35 AM2018-02-26T00:35:22+5:302018-02-26T00:35:22+5:30
चांदवड तालुक्यातील श्रीक्षेत्र राजदेरवाडी सोनीसांगवी ते पैठण पायी दिंडी सोहळा हो संतदास नारायण महाराज ठाकरे, स्वानंद वारकरी मंडळ ट्रस्ट त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. २५) सकाळी चांदवडच्या रंगमहालातून पालखीची पूजा हरिभाऊ जगताप, राजू जगताप, गणेश जगताप, गुड्डूू खैरनार, भिका जगताप, बाळासाहेब गुजराथी, कांतिलाल कासलीवाल, बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते होऊन नंतर मिरवणूक चांदवड शहरातील रंगमहालापासून श्रीरामरोड, शिवाजी चौक, आठवडेबाजारपासून ही दिंंडी व पालखी सोनीसांगवी येथे मुक्कामी गेली.
चांदवड : चांदवड तालुक्यातील श्रीक्षेत्र राजदेरवाडी सोनीसांगवी ते पैठण पायी दिंडी सोहळा हो संतदास नारायण महाराज ठाकरे, स्वानंद वारकरी मंडळ ट्रस्ट त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. २५) सकाळी चांदवडच्या रंगमहालातून पालखीची पूजा हरिभाऊ जगताप, राजू जगताप, गणेश जगताप, गुड्डूू खैरनार, भिका जगताप, बाळासाहेब गुजराथी, कांतिलाल कासलीवाल, बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते होऊन नंतर मिरवणूक चांदवड शहरातील रंगमहालापासून श्रीरामरोड, शिवाजी चौक, आठवडेबाजारपासून ही दिंंडी व पालखी सोनीसांगवी येथे मुक्कामी गेली. तेथून दुसºया दिवशी पालखी सोहळा अॅड. नामदेवराव ठाकरे, गंगाधर ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते पूजन होऊन पुढे पैठणकडे रवाना होईल. पायी दिंडी सोहळा मजल दरमजल करीत गुरुवारी (दि. ८ मार्च) पैठण येथे पोहोचेल व तेथे नारायण महाराज ठाकरे यांच्या काल्याचे कीर्तन व भीका महाराज चिंचोले, बाबाजी जाधव यांच्या वतीने महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.