कॅम्प परिसरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:20 AM2018-07-23T00:20:17+5:302018-07-23T00:20:32+5:30
आषाढी एकादशीनिमित्त नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी भगूरमधून वृक्षदिंडी काढली होती. प्रारंभी शाळेच्या प्रांगणात वृक्षदिंडीचे पूजन शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, प्रितम आढाव, बापू वावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
देवळाली कॅम्प : आषाढी एकादशीनिमित्त नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी भगूरमधून वृक्षदिंडी काढली होती.
प्रारंभी शाळेच्या प्रांगणात वृक्षदिंडीचे पूजन शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, प्रितम आढाव, बापू वावरे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे कार्यवाह मधुसुदन गायकवाड, सहकार्यवाह अ. भि. कवडे, मुख्याध्यापक अ. रा. डावरे, पर्यवेक्षक अशोक बोराडे आदी यावेळी उपस्थित होते. नूतन विद्यामंदिर, नूतन प्राथमिक विद्यामंदिर व वासुदेव अथनी इंग्लिश मिडियमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विठ्ठल-रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेशभूषेत घोषणा देत भगूर गावातून रॅली काढली होती. रॅलीच्या समारोपप्रसंगी वनश्री पुरस्कार प्राप्त चंद्रकांत गोडसे, नगरसेवक दीपक बलकवडे, मोहन करंजकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, भाजपा शहराध्यक्ष प्रसाद आडके, अनंता कापसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने चंद्रकांत गोडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीदत्त पेट्रोलियमच्या वतीने संचालक विद्या वावरे यांनी विद्यार्थ्यांना बिस्किटचे वाटप केले. यावेळी स. ध. महाले यांनी कीर्तनातून आषाढी वारीचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन वि. क. म्हसाळ, अनिल ढोकणे यांनी केले. आभार वि. अ. सानप यांनी मानले.