दिंडोरीच्या कृषी पर्यवेक्षकाला लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 06:04 PM2019-06-28T18:04:53+5:302019-06-28T18:06:01+5:30
शेतकऱ्यांना विक्री केलेल्या ठिबक सिंचनाच्या शासकीय अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना दिंडोरी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
नाशिक : शेतकऱ्यांना विक्री केलेल्या ठिबक सिंचनाच्या शासकीय अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना दिंडोरी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकऱ्यांना विक्री केलेल्या ठिबक सिंचनाचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे याने तक्रारदाराकडे पाचशे रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, पथकाने पडताळणी करून सापळा रचला असता लक्ष्मण काळे याला जनता विद्यालयाच्या कोपºयावर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत विभागाने काळे याला अटक केली आहे.