दिंडोरीच्या शिष्टमंडळाने घेतली विशेष पोलिस महानिरीक्षकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:41+5:302021-03-30T04:10:41+5:30
नाशिकचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची दिंडोरी येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्यावतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, शिवसेना नेते प्रवीण ...
नाशिकचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची दिंडोरी येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्यावतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, शिवसेना नेते प्रवीण जाधव, स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप, भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, राजू उफाडे, गंगाधर निखाडे, वसंत कावळे, अमोल देशमुख, शेतकरी निवृत्ती बोराडे, अमोल जाधव, पंढरीनाथ ढोकरे, शरद बोढाई, नानासाहेब जाधव, अमोल गणोरे, राजेंद्र गणोरे यांनी भेट घेतली.
दिंडोरी येथील शेतकऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यावरून शेतकरी व दिंडोरी विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्यावरील संतापाची लाट पसरली असून सर्व स्तरांतून या मुजोर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीने जोर धरला आहे. चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होऊ नये याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. तसेच दिंडोरीचे पोलिस निरीक्षक यांनी शेतकऱ्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल न केल्यामुळे त्यांची तत्काळ बदली करण्यात आल्याने जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला. यामुळे वरिष्ठांच्या कारवाईबाबत शंका उपस्थित होत असल्याने संबंधित पोलीस निरीक्षक यांना पुन्हा दिंडोरीत रूजू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून चुकीचे गुन्हे दाखल होणार नाही. पूर्ण चौकशी करूनच गुन्हे दाखल होतील तरी नागरिकांनीही कायदा हातात न घेता कायद्याचा सन्मान करावा. सदर दिंडोरी तालुक्यातील झालेल्या घटनेची पूर्ण चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर करण्यात येईल, असे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी सांगितले.
===Photopath===
290321\29nsk_18_29032021_13.jpg
===Caption===
दिंडोरीच्या शिष्टमंडळाने पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची भेट घेतली. त्याप्रसंगी प्रकाश वडजे, प्रवीण जाधव, नरेंद्र जाधव आदी.