दिंडोरी : ६० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 07:24 PM2020-12-18T19:24:00+5:302020-12-19T01:01:39+5:30

दिंडोरी : तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रशासकीय तयारी सुरू असून, तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली.

Dindori: Election program of 60 gram panchayats announced | दिंडोरी : ६० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

दिंडोरी : ६० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासकीय तयारी सुरू : ऐन थंडीत राजकीय उष्मा

उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दि. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत (दि. २५ ते २७ डिसेंबरची सार्वजनिक सुट्टी वगळता) सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत जनता इंग्लिश स्कूल या ठिकाणी स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होईल. नामनिर्देशन मागे घेण्यासाठी दि. ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असून, नामनिर्देशन माघारीची नोटीस संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यावी. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी, कोशिंबे, खडक सुकेणे, गोळशी, गोंडेगाव, चिंचखेड, जोपुळ, देवसाने, पालखेड बंधारा, वणी खुर्द, सोनजांब, आंबाड, करंजखेड, बोपेगाव, हस्तेदुमाला, इंदोरे, गांडोळे, चाचडगाव, चौसाळे, परमोरी, पाडे, पांडाणे, वलखेड, वारे, वाघाड, अवनखेड, कुर्णोली, कोकणगाव बु., कोल्हेर, जोरण, पिंप्रीआंचला, पुणेगाव, बादगीचा पाडा, भनवड, माळे दुमाला, लोखंडेवाडी, वनारे, विळवंडी,पिंपळगाव केतकी, आंबे दिंडोरी, नाळेगाव, चंडिकापूर, दहिवी, महाजे, ओझे, मातेरेवाडी, कादवा म्हाळुंगी , फोपळवाडे, लखमापूर, मावडी, करंजाळी, तिसगाव, खेडगाव, जऊळके वणी, म्हेळुस्के, हातणोरे, शिंदवड, तिल्लोळी, तळेगाव वणी, पिंपळगाव धूम या सर्व ग्रामपंचायतींचे मतदान दि. १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल, अशी माहिती तहसीलदार पवार यांनी दिली.

Web Title: Dindori: Election program of 60 gram panchayats announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.