दिंडोरी हातनोरे, बहादुरी गोंडेगाव रस्त्याचे भाग्य उजाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:18+5:302021-07-03T04:10:18+5:30
दिंडोरी : तालुक्यातील दिंडोरी हातनोरे, उमराळे व बहादुरी खेडगाव, गोंडेगाव या रस्त्यांचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील दिंडोरी हातनोरे, उमराळे व बहादुरी खेडगाव, गोंडेगाव या रस्त्यांचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले आहे. तालुक्यातील दिंडोरी, निळवंडी, हातनोरे, उमराळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. निळवंडी, पाडे हातनोरे येथील ग्रामस्थांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भारती पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले, भास्कर भगरे, पं.स. माजी उपसभापती कैलास पाटील यांच्याकडे मागणी केली होती. तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी येथे आढावा बैठकीत सदर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेत प्रस्तावित केल्याचे सांगितले होते. सदर रस्त्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळवली आहे. सदर रस्त्याच्या १३.५ किमीसाठी सुमारे साडेनऊ कोटींच्या, तर बहादुरी खेडगाव गोंडेगाव या ८.८५९ किमी रस्त्यासाठी सुमारे ५ कोटी ५८ लाखांच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे. सदर कामांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच काम सुरू होणार असून ग्रामस्थांनी खासदार भारतीताई पवार व सदर रस्त्याचे काम होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहे.