दिंडोरी, सुरगाण्यात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:50 PM2018-08-04T12:50:17+5:302018-08-04T12:50:27+5:30

दिंडोरी /सुरगाणा : तीन चार दिवस बऱ्यापैकी उघडीप दिल्यानंतर शनिवारी दिंडोरी व सुरगाणा तालुक्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले.

 Dindori, heavy rain in the Surgan | दिंडोरी, सुरगाण्यात जोरदार पाऊस

दिंडोरी, सुरगाण्यात जोरदार पाऊस

Next

दिंडोरी /सुरगाणा : तीन चार दिवस बऱ्यापैकी उघडीप दिल्यानंतर शनिवारी दिंडोरी व सुरगाणा तालुक्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले. जवळपास गेला सव्वा महिनाभर येथे पाऊस सुरू आहे. विश्रांती न घेता कमी अधिक प्रमाणात सुरु असलेल्या पावसाने गेले तीन चार दिवस उघडीप दिली होती. मात्र आज सकाळपासूनच पावसाला जोरदार सुरु वात झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. त्यामुळे शहराच्या विविध भागातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता.
दरम्यान, पावसाळा सुरु होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी निफाड तालुक्यातील अनेक भागांत अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. खरिपातील पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.दुबार पेरणीचे सावट शेतकरी वर्गावर घोंगावत असल्याने शेतकरी वर्ग चातकासारखी पावसाची वाट बघत आहे. देवगाव परिसरातील जलसाठे अद्यापही तहानलेले असल्याने तीव्र पाणीटंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवगाव परिसरातील बंधारे व तलाव कोरडेच आहेत
काही दिवसांत अशीच परिस्थिती राहिली तर देवगावकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्यातील फेब्रुवारी महिन्याच्या सुरु वातीपासूनच पाणीसाठा कमी झाला असल्याचे चित्र होते. एप्रिल व मे मिहन्याच्या कडक उन्हामुळे परिस्थिती आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे बहुतेक भागाचा पाणीसाठा खालावला असल्याने अनेक भागांत भीषण पाणीटंचाईची स्थिती आहे. काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसावर पेरणी व लागवड झालेली आहे. काही भागातील पिके सलाईनवर असल्याने पावसाची अपेक्षा आहे. आता तर शेतकºयांनी पिकांना मोठा खर्च केला. त्यात पावसाने दडी मारल्याने आणि दोन महिन्यांत पिकांना आवश्यक तेवढा पाऊस पडला नाही तर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.
 

Web Title:  Dindori, heavy rain in the Surgan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक