दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: चौथ्या फेरीत भारती पवार यांची मुसंडी; महाले यांना ३९ हजार मतांनी टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:35 PM2019-05-23T12:35:34+5:302019-05-23T12:36:01+5:30

चौथ्या फेरीत १ लाख ४ हजार ४५३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ६५ हजार ९७ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते.

Dindori Lok Sabha election results 2019: Bharti Pawar's in fourth round; Mahale was beaten by 39 thousand votes | दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: चौथ्या फेरीत भारती पवार यांची मुसंडी; महाले यांना ३९ हजार मतांनी टाकले मागे

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: चौथ्या फेरीत भारती पवार यांची मुसंडी; महाले यांना ३९ हजार मतांनी टाकले मागे

Next
ठळक मुद्देधनराज महाले यांच्या पारड्यात ६५ हजार ९७ मतं पडली

दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले आहे. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होत आहे. तसे पाहिले तर भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार यंदा आयात केले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहतो की राष्ट्रवादीचा कब्जा होतो, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुसऱ्या फेरीपासून फेरीनंतर भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून चौथ्या फेरीत १ लाख ४ हजार ४५३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ६५ हजार ९७ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते; मात्र त्यानंतर ते मोठ्या फरकाने मागे पडले आहेत. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीमध्ये नाशिकपेक्षा अधिक ६५ टक्के इतके मतदान दिंडोरीत झाले. गेल्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना ५ लाख ४२ हजार ७८४ मतं मिळाली होती, तर डॉ. भारती पवार यांना२ लाख ९५ हजार १६५ मतं मिळाली होती.
 

 

Web Title: Dindori Lok Sabha election results 2019: Bharti Pawar's in fourth round; Mahale was beaten by 39 thousand votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.