दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: भारती पवार यांचा विजय निश्चित; पावणे दोन लाख मतांनी महाले पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 07:41 PM2019-05-23T19:41:17+5:302019-05-23T19:41:39+5:30
२२व्या फेरीनंतर ५ लाख ३४ हजार ७६३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख ४८ हजार ७३५ मतं पडली आहेत. पवार यांनी १लाख ८६ हजार २८ मतांनी २२व्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे.
दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले आहे. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होत आहे. तसे पाहिले तर भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार यंदा आयात केले होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहतो की राष्ट्रवादीचा कब्जा होतो, याकडे मतदारांचे लक्ष लागून होते; मात्र मतमोजणीच्या २२ फेऱ्याअंती आलेल्या आकडेवारीवरून मतदारसंघ आपल्याकडे राखण्यास यश मिलविल्याचे दिसते.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुस-या फेरीपासून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून २२व्या फेरीनंतर ५ लाख ३४ हजार ७६३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख ४८ हजार ७३५ मतं पडली आहेत. पवार यांनी १लाख ८६ हजार २८ मतांनी २२व्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीमध्ये नाशिकपेक्षा अधिक ६५ टक्के इतके मतदान दिंडोरीत झाले. गेल्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना ५ लाख ४२ हजार ७८४ मतं मिळाली होती, तर डॉ. भारती पवार यांना२ लाख ९५ हजार १६५ मतं मिळाली होती.