दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: दुसऱ्या फेरीत पवार यांची मुसंडी; महाले यांना २०,४०१ मतांनी टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:16 AM2019-05-23T11:16:19+5:302019-05-23T11:16:54+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुसºया फेरीनंतर भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून ५१,७३० मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३१,३२९ मतं पडली आहेत.

Dindori Lok Sabha election results 2019: Pawar's grasp in second round; Back to Mahale 20,401 votes cast | दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: दुसऱ्या फेरीत पवार यांची मुसंडी; महाले यांना २०,४०१ मतांनी टाकले मागे

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: दुसऱ्या फेरीत पवार यांची मुसंडी; महाले यांना २०,४०१ मतांनी टाकले मागे

Next
ठळक मुद्देडॉ. भारती पवार यांनी ५१,७३० मते मिळविली

दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले आहे. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होत आहे. तसे पाहिले तर भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार यंदा आयात केले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहतो की राष्ट्रवादीचा कब्जा होतो, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुस-या फेरीनंतर भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून ५१,७३० मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३१,३२९ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते; मात्र दुस-या फेरीत पवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीमध्ये नाशिकपेक्षा अधिक ६५ टक्के इतके मतदान दिंडोरीत झाले. गेल्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना ५ लाख ४२ हजार ७८४ मतं मिळाली होती, तर डॉ. भारती पवार यांना२ लाख ९५ हजार १६५ मतं मिळाली होती.

 

Web Title: Dindori Lok Sabha election results 2019: Pawar's grasp in second round; Back to Mahale 20,401 votes cast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.