दिंडोरी नगरपंचायत करणार गणेश मूर्ती संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 06:55 PM2020-08-31T18:55:14+5:302020-08-31T18:59:54+5:30
दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन करताना काळजी घेण्यासाठी दिंडोरी नगरपंचायततर्फेनागरिकांनी गणारयाचे घरीच विसर्जन करावे असे आवाहन करण्यासोबतच विसर्जन रथद्वारे गणेश मूर्ती संकलन करण्यात येणार असून सुरक्षेसाठी या उपक्र मास प्रतिसाद देत जनतेने सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन करताना संसर्ग वाढू नये यासाठी यावर्षी शक्यतो नदीत बंधाऱ्यात गणेश विसर्जन करू नये यासाठी प्रशासनाने आवाहन केले असून त्यादृष्टीने दिंडोरी नगरपंचायतने विविध पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली आहे. दिंडोरी नगरपंचायततर्फे शक्यतो नागरिकांनी स्वत:च्या घरीच गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. नगरपंचायततर्फेगणेश विसर्जन रथ प्रत्येक गल्लीत फिरवला जाणार असून ग्रामस्थांच्या त्यात गणेश मूर्ती संकलित करण्यात येणार आहे.
तसेच शहरात रामेश्वरी बंधारा, ज्ञानदा क्लासेस जवळ, शिवाजी नगर, कादवा नगर अंगणवाडी, कोंगाई माता मंदिर निळवंडी रोड या ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र स्थापित करण्यात आले असून तेथे गणेश मूर्ती संकलित करण्यात येणार आहे.शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा करत प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.