दिंडोरी पोलिसांनी पकडला २९ लाख रुपयांचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:32 AM2021-09-02T04:32:42+5:302021-09-02T04:32:42+5:30

३० ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास आयशर वाहन (क्रमांक एमएच ०९ सीयूू ५६३४) हिची ...

Dindori police seize gutka worth Rs 29 lakh | दिंडोरी पोलिसांनी पकडला २९ लाख रुपयांचा गुटखा

दिंडोरी पोलिसांनी पकडला २९ लाख रुपयांचा गुटखा

Next

३० ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास आयशर वाहन (क्रमांक एमएच ०९ सीयूू ५६३४) हिची दिंडोरी पोलिसांनी तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधक केलेला अन्नपदार्थ, सुगंधी गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची गुजरातमधून चोरटी वाहतूक करत महाराष्ट्रात विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे आढळून आले. त्यात मानवी शरीरावर अपायकारक परिणाम करणारे कर्करोगासारखे दुर्धर आजार व मृत्यूस निमंत्रण करणारा २३ लाख ७६ हजार रुपये किमतीचा गीतांजली पानमसाला, तसेच अन्य सुगंधी तंबाखू, पानमसाला, असा एकूण २९ लाख ७० हजार रुपये किमतीचा माल होता. सदरप्रकरणी सलीम यासीन काझी (३२) रा. कर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर व वाहनचालक रसूल यासीन काझी (३०), रा. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांच्यासह व्हीआरएल लॉजिस्टिक सुरत, व्हीआरएल लोनीस्टिक जोधपूर, व्हीआरएन लॉजिस्टिक सोलापूर, उत्पादक पेढी दिनेश फ्राग्रेस, पाली रोड, मोगरा जोधपूर फ्रासनेला मंगला, बंगलोर व दिनेश फाग्रस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुद्देमालासह आयशर जप्त केला असून, वाहनचालक व त्याच्यासोबत असलेल्यास अटक केली आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी योगेश रोहिदास देशमुख यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण करत आहेत.

Web Title: Dindori police seize gutka worth Rs 29 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.