दिंडोरी तालुक्यात 287 रु ग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 06:32 PM2020-08-24T18:32:58+5:302020-08-24T18:33:46+5:30
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात कोरोना ने अगोदर च्या काळात आपले रौद्र रूप धारण करून रग्णाची संख्या वाढत नेली होती. परंतु तालुका आरोग्य विभागाने वेळीच नियोजन करत कोरोना प्रार्दूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास रोखण्यात यश मिळवले असून 287 रु ग्ण बरे झाले आहे.
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात कोरोना ने अगोदर च्या काळात आपले रौद्र रूप धारण करून रग्णाची संख्या वाढत नेली होती. परंतु तालुका आरोग्य विभागाने वेळीच नियोजन करत कोरोना प्रार्दूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास रोखण्यात यश मिळवले असून 287 रु ग्ण बरे झाले आहे.
शहरी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना चे वातावरण व्यापक झाले होते. प्रत्येक तालुक्यात ही एक प्रकारे डोकेदुखी बनली होती. त्यात दिंडोरी तालुका ही मागे नव्हता. तालुक्यात अनेक रग्ण सापडत होते. तसेच या कोरोनाने दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला आपले लक्ष केंद्रित करून औद्योगिक क्षेत्राला विळखा मारला होता. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या तोंडाचे पाणी पळाले होते. परंतु या कामी प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार यांचे मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ कोशिरे व त्यांचे सर्व कर्मचारी कोरोना योद्धाच्या रूपाने नागरिकांची सेवा, जनजागृती करून कोरोनाला पायबंद करीत होते.
तालुक्यात कोरोनाने खेडी पाडी, गल्ली बोळ वेगवेगळ्या कंपन्या, आॅफिस इ. मध्ये आक्र मण केले होते. परंतु त्या त्या ठिकाणी आरोग्य विभागाने आपली तत्परता दाखवत त्यावर पायबंद घालण्याचा प्रयत्न केला व रग्णाची कशी सुटका होईल. यासाठी योग्य दिशेचा स्विकार करून मदतीचा हात दिला. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात कोरोना रु ग्णांची वाढलेली संख्या कमी होत गेली. आज अनेक रग्ण उपचार घेऊन पुर्णपणे बरे झाल्याने आनंद व्यक्त करीत आहे. तर काही वर तात्काळ उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
दिंडोरी तालुका कोरोनो आकडेवारी पुढील प्रमाणे -
1)आता पर्यंतचे एकुण पॉझटिीव्ह रग्ण:- 356
2)आता पर्यंत चे एकुण बरे झालेले रग्ण:- 287
3)आता उपचार घेत असलेले एकुण रग्ण:- 58
4)आता पर्यंत कोरोना ने मृत्यू पावलेले एकुण रग्ण:- 11
जनतेमध्ये केलेली वेळोवेळी आरोग्य जनजागृती व शासकीय नियम पाळून जनतेला जागरूक राहाण्यासाठी प्रयत्न केले. त्याला आमच्या सर्व कर्मचारी वर्गाने चांगली साथ दिली. व नागरिकांनी सर्व शासनाने दिलेले लॉक डाऊनचे नियम पाळल्यामुळे आम्हाला कोरोनावर पायबंद करता आला आहे.
- डॉ.सुजित कुमार कोशिरे, तालुका आरोग्य अधिकारी, दिंडोरी.