दिंडोरी तालुक्यात विक्र मी १३१ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:51 AM2019-08-05T00:51:26+5:302019-08-05T00:52:17+5:30
दिंडोरी : तालुक्यात संततधार सुरू असल्याने धरणे भरली असून, धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.
दिंडोरी : तालुक्यात संततधार सुरू असल्याने धरणे भरली असून, धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.
गेल्या नऊ तासांपासून सलग पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने सर्वत्र दाणादाण झाली आहे. रविवारी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी १३१ मिमी पाऊस पडला आहे. या पावसाने शेतीचे मोठे नुकसान होत असून, अनेक नदी नाल्यांचे पूल पाण्याखाली गेल्याने दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले.सकाळी सहा ते दुपारी तीनपर्यंत पडलेला पाऊस :
सर्कलनुसार दिंडोरी : १३१.०० मिमी., वणी : ६९.०० मिमी. उमराळे : १३८.०० मिमी., कोशिंबे : ११०.०० मिमी. वरखेडा : ६२.०० मिमी., ननाशी : १४३.०० मिमी., मोहाडी : ६०.०० मिमी. इतका पाऊस पडला असून, दिंडोरी तालुक्यातील सहा धरणांपैकी करंजवण ९४ टक्के विसर्ग २३९५० क्यूसेक, पालखेड ७० टक्के विसर्ग ६३९७० क्यूसेक, वाघाड १०० टक्के विसर्ग १०८४२ क्यूसेक, पुणेगाव ९० टक्के विसर्ग ५६७३ क्यूसेक; फक्त ओझरखेड व तिसगाव ही दोन्ही धरणे काही प्रमाणात भरली आहे.वाघाड उजवा कालवा फुटला
दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरण १०० टक्के भरल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. या धरणातून येणाऱ्या वाघाड उजवा कालवा मडकीजाम येथील कामाले वस्तीजवळ फुटल्याने त्याजवळून धामण नदी असल्यामुळे कालव्याचे पाणी नदीपात्रात जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी हा कालवा फुटला होता. त्यानंतर प्रशासनाने दुरु स्ती केली; पण रविवारी पुन्हा त्याठिकाणी कालवा
फुटल्याने नदीत पाणी वळाले व हानी टळली आहे.नाशिक वणी रस्ता तब्बल नऊ तास बंद
नाशिक-वणी रस्त्यावर वलखेड फाट्याजवळ कोळवन नदीवरील पुलावर पुराचे पाणी आल्याने सकाळी दहाच्या दरम्यान बंद झाली. त्यानंतर दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने वाहतूक बंद होती. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर पाणी ओसरून सायंकाळी ७ च्या दरम्यान वाहतूक सुरू झाली. दिंडोरी बाजूने दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे व त्यांचे सहकारी तर वलखेडच्या बाजूने वणीचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवत बघ्यांना दूर रोखले. वणी सुरगाणा कळवण सप्तशृंगगड जाणाºया बस व खासगी वाहने नाशिककडे परत गेले तर काही पर्यायी मार्गाने गेले; मात्र गुजरात परिवहनच्या बस दिंडोरीत उभ्या होत्या प्रवाशांचे यामुळे हाल झाले जड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.