दिंडोरी तालुक्यात नागली, वरई पिक झाले दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:38 PM2020-09-27T17:38:10+5:302020-09-27T17:39:53+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग एके काळी नागली व वरईचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थिती मध्ये या परिसरामध्ये शासनाच्या योजना पोहचल्यांमुळे पावसाळी हंगामात पाण्याची साठवणुक करण्यासाठी छोट मोठ्या पाझार तलावाची न्ाििर्मती झाल्यांमुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या पारपांरिक पिकामध्ये बदल करु न जास्त उत्पादन देणाºया पिकांकडे वळल्यांमुळे नागली व वरई पिक या भागातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

In Dindori taluka, Nagli and Varai crops became rare | दिंडोरी तालुक्यात नागली, वरई पिक झाले दुर्मिळ

दिंडोरी तालुक्यात नागली, वरई पिक झाले दुर्मिळ

googlenewsNext
ठळक मुद्देलखमापूर : परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

लखमापूर : दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग एके काळी नागली व वरईचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थिती मध्ये या परिसरामध्ये शासनाच्या योजना पोहचल्यांमुळे पावसाळी हंगामात पाण्याची साठवणुक करण्यासाठी छोट मोठ्या पाझार तलावाची न्ाििर्मती झाल्यांमुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या पारपांरिक पिकामध्ये बदल करु न जास्त उत्पादन देणाºया पिकांकडे वळल्यांमुळे नागली व वरई पिक या भागातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
साधारणपणे नागली व वरई पिक चार महिन्याचे असते त्यांत या पिकांचे रोपे तयार करावे लागतात. मे महिन्यातच या रोपासाठी काडी कचरा गोळा करून रोपाची जागा भाजून घेतात. व जून महिन्यात पहिला पाऊस पडल्या नंतर रोपे टाकली जातता साधारण २२ते२३ दिवसा मध्ये हे रोपे तयार होतात मग जमिनीची मशागत करून व पावसाचा अदांज पाहून नागली , वरई पिकाची लावणी केली जाते हे पिक जास्ती जास्त डोंगरउतारावर घेतले जाते या पिकाला भरपूर पाऊस लागतो.सध्या नागली व वरईला ग्रामीन भागासह शहरी भागात जास्त मागणी आहे.नागलीचा उपयोग भाकरी तसेच पापड बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच सध्यात मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये नागली पापड , बिस्कीटला जास्त मागणी आहे.
वरईचा वापर ग्रामीण व शहरी भागामध्ये उपवासासाठी केला जातो. असे असले तरी मागणीच्या प्रमाणात उत्पादन कमी होत असल्यामुळे व नागली वरई पिकाचे एकरी उत्पादन खूपच कमी मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाने या पिकांकडे पूर्णपणे पाठ फिरविल्यामुळे नागली व वरई हे पिक तालुक्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परवडत नसलेली शेती म्हणून या पिकाकडे पाहिले जाते परिणामी या परिसरातील शेतकºयांनी या पांरपारिक शेतीकडे पाठ फिरवून इतर भाजीपाला पिकाना पंसती दिली आहे.

१) नागली ,वरई, हे पिके पुर्वीच्या काळी दिंडोरी तालुक्यातील सोन्याचे पिक म्हणून ओळखले जायचे. परंतु आता मात्र काळाच्या ओघात या पिकाला उतरती कळा लागल्याने दिंडोरी तालुक्यात नागली व वरई हे दृष्टी आड जाते कि काय असा सवाल निर्माण झाला आहे.
२)कृषी विभागाकडून या पिकांसाठी शेतकरी वर्गाला वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या स्वरूपाची मार्गदर्शन देवून ही शेतकरी वर्गाने हे पिक परवडत नसल्याची खंत दाखिवली आहे.

नागली व वरई पिकापासून एकरी उत्पादन खूप कमी मिळत असल्यांमुळे उत्पन्नात घट येते . त्यांमुळे आम्ही हे पिक फक्त कुटूंबासाठी लागेल एवढेच घेतो. नागली,वरई जागी आम्ही इतर पिकानां पंसती दिली आहे.
- मोहनराव गायकवाड ,शेतकरी.

Web Title: In Dindori taluka, Nagli and Varai crops became rare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.