दिंडोरी तालुक्यातील धरणसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:19 AM2017-07-25T01:19:36+5:302017-07-25T01:19:48+5:30

दिंडोरी : गेल्या आठवडाभरात दिंडोरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला असून, पालखेड, पुणेगाव, वाघाड धरणांची ओव्हरफ्लोकडे वाटचाल सुरू आहे.

Dindori taluka's increase in d | दिंडोरी तालुक्यातील धरणसाठ्यात वाढ

दिंडोरी तालुक्यातील धरणसाठ्यात वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : गेल्या आठवडाभरात दिंडोरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला असून, पालखेड, पुणेगाव, वाघाड धरणांची ओव्हरफ्लोकडे वाटचाल सुरू आहे. पालखेड व पुणेगावमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या वर्षी सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली होती. यंदाही धरणांमध्ये जुलै महिन्यातच समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. दिंडोरी तालुक्यात वळीवाच्या पाऊस कमी झाला; मात्र गत पंधरवड्यात झालेल्या संततधोरेने सर्व नदी-नाल्यांना पूर आल्याने धरणांच्या साठ्यांत झपाट्याने वाढ झाली आहे. पालखेड धरण ८५ टक्के भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुणेगाव धरण ६५ टक्के भरल्याने विसर्ग सुरू केला आहे. वाघाड धरण ८२ टक्के ओझरखेड ४१ टक्के,करंजवन ५९ टक्के तर तिसगाव २४ टक्के भरले असून पालखेड धारण समूहात एकूण ४३ टक्के साठा झाला असून तो गतवर्षी पेक्षा जास्त आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसाने एकाच दिवसात सर्व धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे.
पालखेड धरणातून डाव्या कालव्याला आठ दिवसांपासून पाणी सोडले असल्याने येवला मनमाड ची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होत आहे, तर पुणेगावच्याही डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने चांदवडकरांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: Dindori taluka's increase in d

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.