दिंडोरीच्या कोरोनाबाधित डॉक्टरचा आरोग्य केंद्राच्या पथकाशी वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 07:19 PM2020-09-19T19:19:01+5:302020-09-20T00:34:40+5:30

दिंडोरी : दिंडोरीच्या एका प्रतिष्ठित उच्च शिक्षति डॉक्टरकडून कोरोना बाधित रु ग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबीयातील व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी घरी आलेल्या आरोग्य सेवक, आशा प्रवर्तक यांना शिविगाळ करु न अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार शिवाजीनगर भागात घडला. याप्रकरणी दिंडोरी पोलिसात डॉक्टर व आई विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Dindori's coronary artery doctor argues with health center team | दिंडोरीच्या कोरोनाबाधित डॉक्टरचा आरोग्य केंद्राच्या पथकाशी वाद

दिंडोरीच्या कोरोनाबाधित डॉक्टरचा आरोग्य केंद्राच्या पथकाशी वाद

Next
ठळक मुद्देडॉक्टरांचे निवासस्थान व हॉस्पिटल परिसर सील करण्यात आले

दिंडोरी : दिंडोरीच्या एका प्रतिष्ठित उच्च शिक्षति डॉक्टरकडून कोरोना बाधित रु ग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबीयातील व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी घरी आलेल्या आरोग्य सेवक, आशा प्रवर्तक यांना शिविगाळ करु न अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार शिवाजीनगर भागात घडला. याप्रकरणी दिंडोरी पोलिसात डॉक्टर व आई विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिंडोरीच्या शिवाजीनगर भागत राहणारे एक डॉक्टर यांना कोरोनाची लागण होवून त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझििटव्ह आल्याने डॉक्टर व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्तींची कंटेंटमेंट झोन तयार करण्यासाठी माहिती संकलित करण्यासाठी डॉक्टरांच्या शिवाजीनगर येथे असलेल्या निवासस्थानी आरोग्य सेवक ए. ए. सय्यद, राजेंद्र जगताप, गट प्रवर्तक ज्योती जाधव, आशा कार्यकर्ती अिश्वनी गांगुर्डे हे गेले असता डॉक्टरने अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला. व परत घराकडे फिरकले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर डॉक्टरांच्या आईने आपटून आत्महत्या करण्याची धमकी देत आरोग्य सेवकांना माघारी परतण्याचे सांगत आरडाओरड केली. तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र दोनचे आरोग्य सेवक अमजद अहेमद सय्यद राहणार पखालरोड, जुने नाशिक यांच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलिसांनी कोरोना विषाणु संदर्भात महाराष्ट्र शासनाने, पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशांचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करु न हयगय व बेदरकापणे मानवी जिवीतास व याक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करु न कोरोना संसर्ग पसरविण्याची हयगईची व घातक कृती करु न शासनाचा विविध आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांचे निवासस्थान व हॉस्पिटल परिसर सील करण्यात आले असुन परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. पुढील तपास दिंडोरी पोलिस करत आहेत.

Web Title: Dindori's coronary artery doctor argues with health center team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.