दिंड्यांनी फुलले रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:54 PM2019-01-30T15:54:39+5:302019-01-30T15:55:11+5:30
नायगाव - हाती भगवी पताका घेऊन टाळ-म्रुदंगाचा गजर, हरीनामाचा जयघोष करत.संतश्रेष्ठ निवृत्ती नाथांच्या दर्शनासाठी मजल दरमजल करत हजारो वारक-यांचे पाऊले त्रंबकेश्वरकडे मार्गस्त झाले.
नायगाव - हाती भगवी पताका घेऊन टाळ-म्रुदंगाचा गजर, हरीनामाचा जयघोष करत.संतश्रेष्ठ निवृत्ती नाथांच्या दर्शनासाठी मजल दरमजल करत हजारो वारक-यांचे पाऊले त्रंबकेश्वरकडे मार्गस्त झाले. सिन्नर तालुक्यातील नायगाव खो-यातील सर्वच रस्ते वारक-यांच्या दिंड्यांनी फुलून गेले आहे. जायगाव येथे शुक्र वारी सायंकाळी खडांगळी येथिल गणपत महाराज कोकाटे यांच्या दिंडीचे जायगाव ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले.सायंकाळी हरिपाठ,प्रवचनाचा कार्यक्र म रात्रीच्या भोजनाची व्यवस्था व सकाळी वारक-यांच्या अंघोळीसाठी गरम पाणी व चहा,नाश्त्याची जायगाव ग्रामस्थांनी व्यवस्था केली होती. ब्राम्हणवाडे येथेही ग्रामस्थांनी देवपुर येथिल कोकाटे महाराजांच्या दिंडी बरोबर इतर दिंड्यांचे स्वागत केले.यावेळी सरपंच मंगला घुगे,उपसरपंच सुनिल गिते,संजय गिते,भिमा गिते,सुनिल रामराजे,नामदेव गिते,दिलीप घुगे,देवराम गिते,गोदा युनियनचे संचालक कैलास गिते,माजी उपसरपंच खंडु गिते आदींनी वारक-यांची व्यवस्था केली.रविवारी दिंडीचे त्रबंककडे प्रस्थान झाले.