दिंडया चालल्या.. चालल्या....नाशिक जिल्ह्यात घुमतोय हरिनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:57 PM2018-01-08T13:57:25+5:302018-01-08T13:57:37+5:30
पेठ -श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवत्तीनाथ यात्रेच्या निमित्ताने पेठ सुरगाण्यासह गुजरात राज्यातील वारकºयांनी त्र्यंबकची वाट धरली असून आदिवासी भागातील दºयाखोºयात टाळ मृदुंगासह हरिनामाचा गजर ऐकू येत आहे.
पेठ -श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवत्तीनाथ यात्रेच्या निमित्ताने पेठ सुरगाण्यासह गुजरात राज्यातील वारकºयांनी त्र्यंबकची वाट धरली असून आदिवासी भागातील दºयाखोºयात टाळ मृदुंगासह हरिनामाचा गजर ऐकू येत आहे. केळविहीर येथील श्री.सद्गूरू स्वानंद आत्मोन्नती संस्थेच्या वतीने गत २६ वर्षापासून केळविहिर ते त्र्यंबकेश्वर दिंडीचे आयोजन करण्यात येते. खांद्यावर भगवा ध्वज, डोक्यावर तुळस व गळ्यात टाळ घेत वारकरी मजल दरमजल करीत अतिशय भक्तीमय वातावरणात मार्गक्र मण करीत असतात. ठिकठिकणी भाविक व ग्रामस्थाकडून दिडयांचे भव्य स्वागत करण्यात येत असते. भक्ती रसात न्हाऊन निघालेले वारकरी भजन किर्तनात दंगून जातात.नायगाव खो-यातील सर्वच रस्त्यावर गेल्या दोन-तीन दिवसांपासुन पायी दिंड्यांचे मार्गक्र मण होत असल्याने टाळ-मृदंग व हरिनामाच्या गजराने परिसरातील वातावरण भक्तीमय बनले आहे.नायगाव ते त्रंबक पायी दिंडीचे आज सकाळी प्रस्थान झाले. ह.भ.प.मनोज महाराज जेजुरकर व ह.भ.प.बाजीराव महाराज जेजुरकर यांनी गेल्या दोन वर्षापासून सुरू केलेल्या दिंडीत परिसरातील शेकडो भाविकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी खडांगळी यथ्ोील गणपत महाराज कोकाटे यांच्या दिंडीचे जायगाव येथिल ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले. सायंकाळी हरिपाठ, किर्तन झाले. त्यानंतर गावातील प्रत्येक घरातुन आलेल्या विविध प्रकारच्या भाज्यांना एकत्रित तडका देऊन तयार झालेल्या मिक्स भाजी,भाकरी ,ठेचा व कांद्याचे जेवण वारक-यां बरोबर ग्रामस्थांनी घेतले.गेल्या पंचवीस वर्षा पासुन या आगळ्या वेगवेगळ्या भोजनाचा आनंद वारकरी मोठया आनंदानं स्विकारतात. विविध भागातुन त्रंबककडे जाणाºया शेकडो दिंड्यांच्या हरिनामाच्या गजराने संपूर्ण नायगाव खोरा भक्तीमय बनला आहे.रविवारी गोदा युनियनचे संचालक दगु शंकर दिघोळे यांनी देवपुर येथिल दिंडीचे स्वागत करु न भोजन व्यवस्था केली.तसेच अण्णा बाबुराव दिघोळे,पांडुरंग दौंड,जालिंदर सानप,फिकरा दिघोळे आदींनी विविध ठिकाणच्या दिंड्यांचे स्वागत करु ण चहा,नाश्त्याची व्यवस्था केली.