नगरसेवक परिषदेच्या राज्यउपाध्यक्षपदी दिनकर पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:58 PM2020-10-01T23:58:21+5:302020-10-02T01:10:33+5:30
सातपूर :- लोकप्रतिनिधी म्हणून समस्या सोडविण्यासाठी राज्यातील नगरसेवक एकवटले असून त्यांनी सरपंच परिषदे प्रमाणेच महाराष्ट्र राज्य नगरसेवक परिषदेची स्थापना केली आहे.या संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नाशिकचे दिनकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

पुण्यातील हिंजेवाडी येथे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राम जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील नगरसेवकांची परिषद घेण्यात आली. या परिषदेत महाराष्ट्र राज्य नगरसेवक परिषदेची स्थापना करण्यात आली.संस्थापक अध्यक्ष म्हणून पुण्याचे राम जगदाळे तर संघटनेचे राज्य उपाध्यक्षपदी नाशिक महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील,सरचिटणीस म्हणून डॉ.कैलास गोरे (पुणे )यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सरपंच परिषदे प्रमाणेच राज्यभरातील सर्व नगरसेवकांच्या विविध प्रश्नांवर न्याय मागण्यासाठी संघटन उभे करण्यात आले आहे.या बैठकीत जिल्हास्तरावरील पदाधिर्कायांच्या निवडी करण्यात आल्या असून राज्यातील 30 जिल्'ांचे जिल्हाध्यक्ष व 30 जिल्हास्तरावरील महिला आघाडीच्या प्रमुखांची निवड जाहीर करण्यात आली.त्यात नाशिक जिल्'ाच्या जिल्हाध्यक्षपदी मालेगावचे सुनील गायकवाड यांची तर महिला अध्यक्ष म्हणून नवीन नाशिकच्या पुष्पा आव्हाड यांची निवड करण्यात आली.