आहार जनजागृती सप्ताहनिमित्त दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 03:28 PM2018-09-18T15:28:01+5:302018-09-18T15:29:13+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार सप्ताहाची सुरु वात नांदूरवैद्य येथील भैरवनाथ मंदिरात इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती अरु ण मुसळे यांच्या हस्ते करण्यात आली.

या सप्ताहामध्ये ० ते ६ वयोगटातील लाभार्थी, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींसाठी पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, आहार व आरोग्य शिक्षण इत्यादी सेवा पुरवण्यात येत आहे. दि.१ ते ३० सप्टेंबर याकाळात या पोषण आहार उत्साहाचे आयोजन नांदूरवैद्य येथील भैरवनाथ मंदिरात महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे करण्यात आले होते.माता भगिनींना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, कुपोषण, बालमृत्यू, उपजत मृत्यू, स्वच्छता अभियान व एकात्मिक बालविकास योजनेची माहिती यावेळी भैरवनाथ मंदिरात झालेल्या पोषण आहार सप्ताहात येथील महिलांना देण्यात आली. कुपोषणावर मात कशी करायची, आदींसह महिलांच्या आरोग्यविषयी असलेल्या विविध अडचणीबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन अंगणवाडी सेविका सुमन मुसळे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी अंगणवाडी सेविका सुमन मुसळे, सुनिता मुसळे, मोनिका सोनवणे, सुमन भोर, शिवाजी मुसळे, सुरेश मुसळे, मारु ती डोळस तसेच गावातील ग्रामस्थ व महिला मोठय संख्येने या अभियानात सहभागी झाल्या होत्या.