ड्रायपोर्ट निफाडला की धुळ्याला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:23 AM2018-08-02T01:23:28+5:302018-08-02T01:23:48+5:30

भाऊसाहेबनगर : ड्रायपोर्ट निफाड येथे करण्यासंबंधीची कार्यवाही सुरू असताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी मनमाड ते धुळे रेल्वेमार्गासंबंधी घोषणा करताना धुळे येथे ड्रायपोर्ट उभारण्याचा प्रयत्न असल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने सदरचा ड्रायपोर्ट धुळेकरांनी पळविला की काय, अशा चर्चेला उधाण आले आहे.

Diphapaladipodaya blame? | ड्रायपोर्ट निफाडला की धुळ्याला?

ड्रायपोर्ट निफाडला की धुळ्याला?

Next
ठळक मुद्दे चर्चांना उधाण : गडकरी यांच्या वृत्तामुळे संभ्रम

भाऊसाहेबनगर : ड्रायपोर्ट निफाड येथे करण्यासंबंधीची कार्यवाही सुरू असताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी मनमाड ते धुळे रेल्वेमार्गासंबंधी घोषणा करताना धुळे येथे ड्रायपोर्ट उभारण्याचा प्रयत्न असल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने सदरचा ड्रायपोर्ट धुळेकरांनी पळविला की काय, अशा चर्चेला उधाण आले आहे.
निफाड कारखान्यावर ड्रायपोर्ट उभारावा, अशी गळ नाशिककरांनी घातली होती. त्यानुसार जे.एन.पी.टी., महसूल यंत्रणा आदींनी निफाडच्या जागेची पाहणी, सर्वेक्षण तसेच मोजणीही केली होती. दरम्यान, निफाड कारखान्याची मालमत्ता जिल्हा बॅँकेच्या ताब्यात गेली. ड्रायपोर्ट उभारताना जिल्हा बॅँकेशी व्यवहार करावा लागणार, बॅँकेची देणी द्यावी लागणार यासंबंधी बॅँकेच्या पदाधिकारी वर्गाची मंत्रीपातळीवर चर्चाही झाली. मात्र बॅँकेला किती रक्कम द्यायची यावर ड्रायपोर्टबाबत चर्चा थांबली. प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे, असे सवयीचे उत्तर संबंधिताकडून मिळू लागले. आचारसंहिता आणि थकीत विक्रीकर हा अडसर होता. हळुहळु सर्वच स्तरावर अनास्था निर्माण झाली. निफाड कारखाना पुन्हा भवितव्याबाबत अधांतरीच असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
परिवहन मंत्री गडकरी यांनी धुळे येथे ड्रायपोर्ट सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे नव्याने सांगितल्याचे वृत्त प्रसारित झाले अन् निफाडचा ड्रायपोर्ट पळविला की काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंबंधी डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असताना निफाडच्या ड्रायपोर्टचे काम बरेच पुढे गेलेले असून, निफाडलाच ड्रायपोर्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

डॉ.पाटील हे केंद्रिय राज्यमंत्री डॉ. सुरेश भामरे यांचे निकटवर्तीय तर आहेच मात्र त्याहुन अधिक नाशिकला ड्रायपोर्ट व्हावा यासाठी प्रयत्नशील असणा-यांपैकी ते एक मानले जातात.

Web Title: Diphapaladipodaya blame?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.