थेट सरपंच निवडणुकीमुळे वाढली चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:55 PM2017-09-07T23:55:31+5:302017-09-08T00:10:21+5:30
राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणाºया सिन्नर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून, ९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सरपंच पदासाठी प्रथमच थेट निवडणूक होत असल्याने रंगत निर्माण होणार आहे.
नांदूरशिंगोटे : राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणाºया सिन्नर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून, ९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सरपंच पदासाठी प्रथमच थेट निवडणूक होत असल्याने रंगत निर्माण होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नुकताच दुसºया टप्प्यात होणाºया ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यात तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. बारा ग्रामपंचायतींच्या ४२ वॉर्डातून १२० सदस्यांसह थेट सरपंच निवडले जाणार आहे. निवडणूक कार्यक्र म जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुवारी (दि. ७) निवडणुकीची तहसीलदारांमार्फत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याचा दि. १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते साडेचार या वेळेत केली जाणार आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता छाननी होणार आहे. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. त्यानंतर अंतिम यादी जाहीर करून निवडणूक लढविणाºया उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. शनिवारी, ७ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होईल. सोमवारी, ९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येऊन निकाल जाहीर केला जाईल. तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींतून प्रथमच थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. नांदूरशिंगोटे, पाटपिंप्री, ठाणगाव, शहा, वडगाव पिंगळा, किर्तांगळी, कारवाडी, सायाळे, उज्जनी, शास्त्रीनगर, कृष्णनगर, आशापूर या १२ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्या ठिकाणी आचारसंंहिता लागू झाली आहे. निवडणूक होणाºया ठिकाणी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या वॉर्डात मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी कोपरा बैठका घेतल्या जात आहे.