महापालिका काढणार थेट कामांच्या निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:44 AM2019-06-14T01:44:48+5:302019-06-14T01:46:34+5:30
लोकसभा निवडणुकीची नुकत्याच संपलेल्या आचारसंहितेमुळे रखडलेली कामे व पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार लक्षात घेता शहरातील विकासकामे खोळंबून राहू नये यासाठी अंदाजपत्रकात तरतूद असलेल्या कामांच्या थेट निविदा काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्या संदर्भात गुरुवारी महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चाही केली आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीची नुकत्याच संपलेल्या आचारसंहितेमुळे रखडलेली कामे व पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार लक्षात घेता शहरातील विकासकामे खोळंबून राहू नये यासाठी अंदाजपत्रकात तरतूद असलेल्या कामांच्या थेट निविदा काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्या संदर्भात गुरुवारी महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चाही केली आहे.
महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या बजेटचा ठराव महापौरांनी प्रशासनाला पाठविला असून, आता प्रशासनाकडून नगरसेवक निधी आणि विभागनिहाय विकासकामांना झालेली तरतूद यानुसार विकासकामांना प्रारंभ करण्यात आला आहे. अंदाजपत्रकात परिपूर्ण तरतूद असलेल्या विकासकामांची थेट निविदा काढण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे शहरातील रखडलेल्या विकासकामांना वेग येणार असून, नगरसेवकांची कामे पुढे सरकण्यास मदत होणार आहे.
या एकूण प्रकारामुळे महापालिकेच्या विकासकामांना फटका बसू नये म्हणून आता महासभेने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकात विकासकामांना परिपूर्ण निधीची तरतूद करण्यात आली, त्या विकासकामांची थेट निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ज्या विकासकामांसाठी तरतुदीपेक्षा जास्त प्राकलन खर्च आहे, असे प्रस्ताव महासभेत आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.