दिशादर्शक फलक गेले झाडांच्या आड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 03:22 PM2019-09-21T15:22:26+5:302019-09-21T15:27:13+5:30
शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे. त्यामुळे कुठला मार्ग कोठे जातो हे सुद्धा फलकांवर दिसत नसल्यामुळे प्रवाशांची दिशाभुल होत आहे. तर काही प्रवासी भररस्त्यातच आपले वाहने थांबवत फलक वाचण्याचा प्रयत्न करत आहे.
नाशिक : शहरात नव्याने येणाºया प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पालिकाप्रशासनाकडून शहरातील प्रत्येक रत्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे. त्यामुळे कुठला मार्ग कोठे जातो हे सुद्धा फलकांवर दिसत नसल्यामुळे प्रवाशांची दिशाभुल होत आहे. तर काही प्रवासी भररस्त्यातच आपले वाहने थांबवत फलक वाचण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रवाशांना रस्ता माहित नसल्यावर कुणालातरी विचारत आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यास मोठी अडचण निर्माण होत असते. त्यात मोठ्या शहरांमध्ये अनेकांची वेगवेगळ्या मार्गांमुळे फसगत होत असते. त्यामुळे चुकीने प्रवासी एखाद्या वेगळयाच ठिकाणी पोहचत असतो. त्यामुळे शहारामध्ये नव्याने येणाºया प्रवाशांना कुठला मार्ग कोठे जातो व कुठुन जातो हे कळण्यासाठी महापालिकेकडून शहरातील प्रत्येक मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र हे फलक रस्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या बेसुमार वाढलेल्या फांद्यामुळे झाकाळले गेले आहे. त्यामुळे या फलकांवर मार्गाच्या माहितीविषयी काहीच दिसत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांची एकप्रकारची दिशाभुलच होत आहे. शहरातील मुख्य भागांत असलेल्या या फलकांनाच झाडांच्या फांद्यांनी झाक ळले असल्यामुळे याचा फटका प्रवाशांना होतांना दिसतो. त्यामुळे पालिकेने अशा फलकांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे जेणेक रुन शहरात नव्याने येणाºया प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
झाडांची बेसुमार वाढ
शहरातील मुख्य रस्ता असलेला जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील पिनॅकल मॉल, त्र्यंबकनाका भागातील फलकांना मार्गाच्या कडेला असलेल्या झाडांची बेसुमार वाढ झालेली आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्यामुळे येथील दिशादर्शक फलक झाकाळले गेले आहे. तसेच सारडा सर्कल, गंगापुर रोड, पंपिंग रोड भागांतील फलकांची दुरवस्था झाली आहे. याचा फटका शहरात नव्याने येणाºया प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे अशा फलकांची सुधारणा व बेसुमार वाढलेल्या झाडांची तोड करणे गरजेचे आहे.
त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी शहरातून एकमेव मार्ग असल्याचे माहित होते. मात्र शहरात येण्याचा फारसा प्रसंग येत नसल्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाणारा मुख्य मार्ग माहित नव्हता त्यात त्र्यंबकरोड नाक्यावर आल्यावर येथील फलक व्यवस्थित न दिसल्यामुळे चुकीने गर्दीच्या मार्गाने जावे लागले. त्यामुळे रिक्षाचालकाला विचारत पुन्हा फिरुन मुख्य मार्गाला यावे लागले.
नितीन पाटाळे, प्रवासी