मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा नाशिकमध्ये ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 09:58 PM2020-09-24T21:58:10+5:302020-09-25T01:20:12+5:30
नाशिक- मराठा आरक्षणाला सर्वाेच्च न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिल्यानंतर समाजात उफाळून आलेला असंतोष लक्षात घेता महाराष्टÑ शासनाने काही निर्णय घोषित केले असले तरी त्याबाबत साधक बाधक चर्चा होऊन संभ्रम दुर करण्यासाठी येत्या शनिवारी (दि.२६) नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक होणार आहे.

शहरातील पंचवटी भागात औरंगाबाद रोडवरील निलगीरी बाग येथील मधूरम हॉलमध्ये ही बैठक सकाळी दहा वाजता होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्टÑ शासनाने काही निर्णय जाहिर केले आहेत.
मात्र, या निणर्यावर देखील समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. या संमिश्र प्रतिक्रीयांमुळे सामान्य मराठा समाजाचा नागरीक संभ्रमीत झाला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटू नये यासाठी आधी संभ्रम दुर करणे आवश्यक आहे. या पाश्वर्भूमीवर येत्या शनिवारी (दि.२६) नाशिकमध्ये ही बैठक होणार आहे. सकाळी दहा वाजता होणाऱ्या या बैठकीत समाजातील ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, कायदेतज्ज्ञ, जाणकार आपली भूमिका मांडणार आहेत. त्यांनतर आंदोलनाची पुढिल दिशा निश्चित केली जाणार आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या निमंत्रकांनी कळवले आहे.