नाशिकच्या आंदोलनाची दिशा आज ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:58 PM2018-08-07T23:58:02+5:302018-08-07T23:58:27+5:30
नाशिक : मराठा मोर्चाच्या ठोक आंदोलनाला जिथून सुरुवात झाली, त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन मागे घेतले. त्यानंतर राज्यभरातून आंदोलन स्थगित होत असल्याचे वृत्त येत असताना नशिक जिल्ह्यातील आंदोलनाविषयी अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. जिल्ह्यातील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा समाजाच्या बुधवारी (दि. ८) बैठका बोलाविण्यात आल्या असून, या बैठकांमधून मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्ह्यातील आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून सांगण्यात आले आहे.

मराठा समाजाचे परळीत गेल्या २१ दिवसांपासून ठिय्या आंदोनल सुरू होते. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. या आंदोलनानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले, तर गंगापूर येथील काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणासाठी जलसमाधी घेतली. त्यामुळे राज्यभरात हिंसक वळण लागलेल्या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील आंदोलकांनी मात्र कोणतेही गालबोट लागू दिले नाही.
परंतु, अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील राजकीय नेत्यांसह समाजातील काही नेत्यांनी आंदोलनाला चेहरा देण्याचा प्रयत्न करीत समिती स्थापन केली. या समितीने दि. ९ आॅगस्टला ठिय्या आंदोलन करण्याचे नियोजन केले. मात्र, त्यापूर्वीच राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दि. ९ आॅगस्टला चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिलेला होता. त्यामुळे ठिय्या आंदोलन करायचे की चक्का जाम, याविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी मराठा समाजाच्या विविध संघटनांनी मंगळवारी (दि. ७) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नाशिक जिल्हा मराठा समाजाच्या समन्वयक समितीने संपूर्ण आंदोलनाची पुढील दिशा ठिरविण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा समन्वय समितीनेही नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे तालुकानिहाय ठिय्या आंदोलनाचे नियोजन केले.
परंतु, उच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर परळीतील आंदोलनाला ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय
जाहीर झाल्यानंतर नाशिकच्या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.सकाळी विविध संघटनांची बैठक परळीतील आंदोलन स्थगित झाल्यानंतर राज्यातील काही समन्वयकांनी मंगळवारी रात्री बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, त्यावर पुढील दिशा ठरणार असून, नाशिक जिल्ह्यातील विविध मराठा संघटना बुधवारी सकाळी बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याची माहीत तुषार जगताप व करण गायकर यांनी दिली. परळीत आंदोलन स्थगित झाले असले तरी नाशिक जिल्ह्यात आंदोलनाची तयारी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आंदोलनाविषयी भूमिका निश्चित करण्यासाठी नाशिकच्या समन्वयक समितीची बुधवारी सायंकाळी बैठक बोलावली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत बनकर यांनी दिली.